Jasprit Bumrah Son : "आमचा मुलगा तुमच्या मनोरंजनाचा विषय नाही", बुमराहच्या पत्नीचा ट्रोलर्सना चोख दणका!

मुंबई : लखनऊ सुपर जायन्ट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात काल ( दि .२७) पार पडलेल्या सामन्यानंतर जसप्रीत बुमराह आणि संजना यांचा मुलगा अंगदचा एक व्हिडिओ व्हायरलं झाला.या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी अंगदला ट्रोल केले. यावरून क्रीडा प्रसारक आणि जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनने तिचा मुलगा अंगदची खिल्ली उडवणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे.



संजनाने समाज माध्यमांवर स्टोरी पोस्ट करत लोकांना काही सेकंदांच्या फुटेजवरून त्यांच्या छोट्या मुलाला ट्रोल करायचे थांबवण्याचे आवाहन केले. ट्रोलर्सना कडक संदेश देत ती म्हणाली, "आमचा मुलगा तुमच्या मनोरंजनासाठी विषय नाही. जसप्रीत आणि मी अंगदला सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी आमच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करतो कारण इंटरनेट हे एक घृणास्पद ठिकाण आहे आणि कॅमेऱ्यांनी भरलेल्या क्रिकेट स्टेडियममध्ये मुलाला आणण्याचे परिणाम मला पूर्णपणे समजतात, पण कृपया हे समजून घ्या की अंगद आणि मी जसप्रीतला पाठिंबा देण्यासाठी तिथे होतो, दुसरे काही नाही,"


 

संजनाने दीड वर्षांच्या अंगदसाठी "नैराश्य" सारखे मानसिक आरोग्याशी संबंधित शब्द वापरणाऱ्या वापरकर्त्यांचा निषेध केला.पुढे ती म्हणाली "मुलाच्या संदर्भात आघात आणि नैराश्य यासारख्या शब्दांचा वापर हा आपण एक समुदाय म्हणून काय बनत आहोत याचे प्रतिबिंब आहे आणि ते खरोखरच खूप दुःखद आहे. तुम्हाला आमच्या मुलाबद्दल, आमच्या आयुष्याबद्दल काहीही माहिती नाही आणि मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमचे ऑनलाइन मत फक्त तेवढ्यापुरते मर्यादित ठेवा."




नेमकं काय घडलं ?


मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर काल ( दि .२७) पार पडलेल्या मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स सामना चांगलाच रंगला. या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज जसप्रीत बुमराहचा मुलगा टीव्ही स्क्रीनवर दिसला. यावेळी छोट्या अंगदने काही प्रतिक्रिया दिली नाही यावरून इंस्टाग्रामवरच्या काही लोकांनी त्याला ट्रोल केले होते.यावर जसप्रीत बुमराहची पत्नी संजनाने ट्रोल करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहे.

Comments
Add Comment

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

मुंबई : नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या