मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या एच/पश्चिम विभागातील खारदांडा स्मशानभूमी पुन्हा एकदा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. या स्मशानभूमीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्याने ही स्मशानभूमी येत्या गुरुवारी १ मे पासून ते १५ मे २०२५ या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. येथील स्मशानभूमी मागील अनेक महिन्यांपासून बंद होती आणि सहा महिन्यांपूर्वीच दुरुस्तीनंतर ही स्मशानभूमी खुली करण्यात आली होती, परंतु अवघ्या सहा महिन्यांतच पुन्हा एकदा दुरुस्तीच्या कामांसाठी ही स्मशानभूमी बंद ठेवण्यात येत असल्याने महापालिका प्रशासन जनतेला सुविधा देतात की मनस्ताप असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खारदांडा येथे वायू प्रदूषण प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कामांसाठी स्मशानभूमी बंद ठेवण्यायाचत झोपडपट्टी सुधार मंडळाचे पश्चिम विभागाचे उप अभियंता-५ यांनी महानगरपालिकेला पत्राद्वारे कळविले होते. त्यानुसार ही स्मशानभूमी १ ने २०२५ ते १५ मे २०२५ या दरम्यान बंद राखण्यात येईल. एच पश्चिम विभागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ‘एच पश्चिम’ विभागातील सांताक्रुझ स्मशानभूमी येथे पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. दुरुस्तीच्या कामानंतर खारदांडा स्मशानभूमीच्या वापराची सुविधा पूर्ववत उपलब्ध करून देण्यात येईल, असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याद्वारे कळविण्यात आले आहे.
स्थानिक माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खारदांडा स्मशानभूमीच्या दुरुस्तीचे काम मागील वर्षी हाती घेण्यात आले होते. त्यामुळे आधीच ही स्मशानभूमी दुरुस्तीच्या कारणासाठी बंद होती. त्यामुळे याठिकाणी वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवण्याची सूचनाही केली होती. परंतु माचा खर्च वाढत असल्याने त्यांनी खर्चाला काट मारली. परंतु तिच यंत्रणा बसवण्यासाठी महापालिकेला स्मशानभूमी बंद ठेवण्याची वेळ येत आहे. आता सहा महिन्यापूर्वी कुठे ही स्मशानभूमी खुली झाली नाही तोच पुन्हा बंद ठेवावी लागते हे महापालिकेचे मोठे अपयश आहे.
दुरुस्तीचे काम पूर्ण करणार खार दांडा स्मशानभूमीच्या दुरुस्तीचे काम मागील वर्षीच करण्यात आले होते, आणि हे दुरुस्तीचे काम करतानाही महापालिकेच्या यांत्रिक व विद्युत विभागाला या ठिकाणची वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणाही बदलली जावी अशा प्रकारची सुचना स्थानिक माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांनी केली होती; परंतु या मागणीकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आणि दुरुस्तीचे काम पूर्ण करून येथील नागरिकांसाठी खुले करू देण्यात आले.
नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला होता. या…
मुंबई: दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाने नुकताच विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर…
नवी दिल्ली : पाकिस्तानने जिहादची एक नवी पद्धत वापरण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी महिला भारतात…
मुंबई: प्रसिद्ध पॉडकास्टर आणि युट्यूबर रणवीर अल्लाहबादियाला सर्वोच्च न्यायालया (Supreme Court) कडून मोठा दिलासा मिळाला…
पोलादपूर (शैलेश पालकर) : कशेडी घाटातील जुन्या मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai-Goa highway) भोगाव हद्दीत भेगा…
नवी दिल्ली : भारत सरकारने काही वर्षांपूर्वी हवाई दलाकरिता ३६ राफेल विमानं खरेदी करण्याचा करार…