जळगाव : सैराट चित्रपटात (Sairat Movie) जसा पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या तरुणांवर प्राणघातक हल्ला होतो, तशीच घटना जळगावमध्ये (Jalgaon Crime) घडल्याचे समोर आले आहे. मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागात जन्मदाता मुलगी आणि जावयाच्या जीवावर उठला. प्रेमविवाहच्या रागात आरोपी जन्मदात्याने बंदूकीने गोळ्या झाडून मुलीची हत्या केली असून जावयाला गंभीर जखमी केले आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी तृप्ती (२४) आणि अविनाश यांनी प्रेमविवाह केला होता. हा विवाह तृप्तीचे वडील किरण मंगले यांना मान्य नव्हता. परंतु मुलीने प्रेम विवाह केल्याचा राग आरोपी बापाच्या मनात होता. दरम्यान, अविनाशच्या बहिणीच्या हळदी समारंभात या दोघांनी हजेरी लावली असून आरोपी किरण मंगले हे देखील आले होते. त्यावेळी आरोपीला त्याची मुलगी आणि जावई दिसताच रागाच्या भरात त्यांच्या गोळ्या झाडल्या. या घटनेमध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला असून तिच्या पतीच्या पाठीत गोळी घुसल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
मृत तरुणी तृप्तीचे वडील किरण अर्जुन मंगले हे सीआरपीएफचे निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी त्यांच्या परवाना असलेल्या बंदुकीचा वापर करुन हा गोळीबार केला. या घटनेनंतर हळदी समारंभातील इतर वऱ्हाड्यांनी आरोपीला बेदम मारहाण केली असून त्याच्या विरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. तसेच आरोपी देखील या मारहाणीत जखमी झाल्यामुळे त्याला जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलिसांनी आरोपी किरण यांनी या गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल जप्त केली आहे, अशी माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
पुणे शहरात देखील सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली. बहिणीशी पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात धरून तिघांनी एका युवकावर कोयता आणि लोखंडी रॉडने हल्ला करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. ५ एप्रिल रोजी सांगवी गावच्या हद्दीत वडगाव मावळ सांगवी रस्त्यालगत असलेल्या अनुष्का हॉटेलजवळ घडली.
संकेत तोडकर असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून शिवराज बंडू जाधव, यश अजय जाधव, आणि विशाल पाथरवट असे आरोपींचे नावे आहे. या प्रकरणातील दोन आरोपी यश जाधव आणि विशाल पाथरवट यांना वडगाव पोलिसांनी मोठ्या कसरतीने अटक केली आहे. वडगाव मावळ न्यायालयाने या दोघांना आठ दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. तर शिवराज जाधव अद्यापही फरार आहे या प्रकरणाचा अधिकचा तपास मावळ पोलीस करत आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे स्वित्झर्लंडस्थित आय क्यू एअर संस्थेने जागतिक पातळीवरील हवा प्रदूषणाचा व्यापक अहवाल प्रसिद्ध…
उमेश कुलकर्णी अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जी पावले उचलत आहेत त्यांनी…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरांचा वेलू अक्षरश: गगनावर गेला. वर्षभरातील किमतींची तुलना करता सोन्याने…
डॉ. सर्वेश सुहास सोमण आपण आपले डीमॅट खाते उघडून त्यात काही पैस टाकले की आपण…
- सुनील जावडेकर महाराष्ट्रात विशेषत: मुंबई आणि कोकणातील पाच जिल्हे हे ७२० किलोमीटरच्या विस्तीर्ण अशा…
- अल्पेश म्हात्रे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे संबंध असणारा बेस्ट उपक्रम सध्या बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहे.…