Sugercane Juice : उसाचा रस प्या अन् गारेगार राहा!

उन्हाळा सुरु झाला की अनेकांना उष्णतेचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. शरीरात डिहायड्रेशन होण्याची भीती असते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरात थंडावा ठेवण्यासाठी अनेक पेय प्यायली जातात. गरमीमध्ये काही लोकांना बाहेर पडलं की सारखंच लिंबू पाणी किंवा इतर थंड पेय प्यावेसे वाटत असतात. तर काहींना उसाचा रस हा फार आवडीचा असतो. बाजारात उसाच्या रसाच्या गाड्या दिसू लागतात. उसाचा रस हे एक चविष्ट आणि किफायतशीर पेय आहे जे बाजारात सहज उपलब्ध आहे. उन्हाळ्यात उसाचा रस प्यायल्याने डिहायड्रेशनचा त्रास होत नाही शिवाय यामध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराला एनर्जीसुद्धा मिळते. उसाचा रस पिण्याचे शरीराला खूप फायदे होतात. या लेखातून जाणून घेऊया या फायद्यांबद्धल...



१. ऊर्जा मिळते


उसाचा रस प्यायल्याने शरीराला खूप ऊर्जा मिळते. विशेष म्हणजे ही ऊर्जा अनेक तास टिकून राहते. उसाच्या रसामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. या रसात नैसर्गिक साखर देखील असते, जी शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करण्यास मदत करते.




२. वजन कमी करण्यात मदत


वजन कमी करण्यातही उसाचा रस खूप फायदेशीर असतो. यात खूप फायबर असतं. या फायबरमुळं पोट खूप वेळ भरलेलं राहतं. इतर काही खावं वाटत नाही.




३. थकवा दूर होतो



उसाच्या रसामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. उन्हाळ्यात थकवा जाणवत असेल तर हा रस प्यायल्याने थकवा सुरू होईल.



४. मधुमेहीसुद्धा पिऊ शकतात


मधुमेहीसुद्धा उसाचा रस पिऊ शकतात. या रसात आईसोमाल्टोज नावाचं एक तत्व असतं. यात ग्लायसेमिकचं प्रमाण कमी असतं. त्यामुळं मधुमेहींना उसाच्या रसापासून धोका पोचत नाही.




५. रोगप्रतिकारशक्ती वाढते



उसाचा रस प्यायल्याने आपलं शरीर स्वतःला अनेक बॅक्टरियल आणि व्हायरल संसर्गांपासून वाचवू शकतं. सोबतच त्यामुळं रोगप्रतिकारशक्तीही वाढते.



६. सुरकुत्या आणि पिगमेंटेशन दूर होईल



चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि डाग, पांढरे चट्टे दूर करण्यासाठी उसाचा रस प्यायला पाहिजे. यात खूप प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. हे फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करतं.


(टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे