मुंबईतील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी बीएमसीकडून विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन

  41

मुंबई : ‘संपूर्ण सखोल स्वच्छता अभियान’ अंतर्गत मुंबईतील लहानसहान रस्ते, गल्लीबोळांची स्वच्छता केल्यानंतर शासकीय, महानगरपालिका व खासगी रूग्णालये, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग, मैदाने, शाळा आदींच्या स्वच्छतेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आल्या. यातून स्वच्छतेचा यशस्वीरित्या जागर केल्यानंतर आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून मुंबईतील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील स्वयंसेवी संस्था, नागरिक तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आदींच्या सामूहिक प्रयत्नांतून २८ एप्रिल ते ९ मेदरम्यान दररोज सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान संपूर्ण मुंबईत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

‘स्वच्छ आणि सुंदर मुंबई‘ हे ब्रीद घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात तसेच उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली मुंबईतील सार्वजनिक स्वच्छतेसाठी निरनिराळे उपक्रम राबविले जात आहेत.

या अंतर्गत यापूर्वी संपूर्ण मुंबईत ‘सखोल स्वच्छता मोहीम’ राबविण्यात आली. तसेच, १७ मार्च ते २२ मार्च या कालावधीत रोज रात्री १० ते सकाळी ६ वाजेदरम्यान पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांची व्यापक स्वच्छता करण्यात आली. १ ते ४ एप्रिल या कालावधीत मुंबईतील प्रमुख क्रीडांगणांमध्ये आणि त्यानंतर, ७ एप्रिलपासून मुंबईतील शाळांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने संपूर्ण मुंबई महानगरात नियमितपणे स्वच्छता केली जाते. तथापि, अत्यंत सखोल आणि व्यापक पद्धतीने स्वच्छता करण्याच्या अनुषंगाने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. २८ एप्रिल ते ९ मे या कालावधीत दररोज सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान मुंबईतील सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. संबंधित धार्मिक स्थळाशी निगडित विश्वस्त आणि अन्य प्राधिकृतांशी समन्वय साधून त्याठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले जाईल. प्रामुख्याने धार्मिक स्थळाभोवतालचा परिसर, वाहनतळ, घनकचरा संकलनाचे ठिकाण, पदपथ आदींची यांत्रिक तसेच स्वच्छता कर्मचारी यांच्या सहाय्याने व्यापक स्वच्छता करण्यात येईल. अडथळा निर्माण करणाऱया वस्तूंचे निष्कासन, कचऱयाचे संकलन आणि पाण्याने संपूर्ण परिसर धुवून काढणे आदी प्रक्रियांचा देखील यामध्ये समावेश असेल.

स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करत विभागीय कार्यालयांनी (वॉर्ड) सक्रियपणे सहभाग नोंदवण्याच्या सूचनाही उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी दिल्या आहेत.

Comments
Add Comment

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत

Mumbai Building Collapse: मदनपुरात चार मजली इमारत कोसळली, परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या गजबलेल्या परिसरात येत असलेली एक जुनी इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मदनपुरा

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी