Pahalgam Terror Attack : सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि आता... पाकिस्तानला धडकी!

पहलगाममध्ये निष्पाप हिंदू पर्यटकांवर थेट धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या... ३७० हटवल्यानंतर, काश्मीरने लोकशाहीच्या दिशेनं पहिल्यांदाच ठाम पाऊल टाकलं. ४० वर्षांतील सर्वाधिक मतदान! तेही मुस्लिमबहुल भागात! आणि हेच पाकिस्तानला झोंबलं… दहशतवाद्यांना नको होती ही शांतता. नको होतं लोकांचं पर्यटनावर, रोजगारावर लक्ष केंद्रित करणं. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा पाशवी हल्ला केला. ही केवळ दहशतवादी घटना नाही. हा भारताच्या सार्वभौमत्वावर, शांततेवर आणि मानवतेवर झालेला थेट हल्ला आहे आणि या हल्ल्यामागचा सूत्रधार आहे पाकिस्तान! आता प्रश्न एकच.. मोदी सरकार, पुन्हा एकदा 'जशास तसे' उत्तर देणार का? चला जाणून घेऊ या...


जम्मू-काश्मीरमधे हळूहळू शांतता पसरत होती. कलम ३७० हटवल्यापासून पर्यटन बहरत होतं, स्थानिक मुस्लिम जनताही दहशतवादापासून दूर जात होती. आणि त्यातच, पहलगामसारख्या पर्यटनस्थळी झालेला भयानक हल्ला सगळ्यांना हादरवून गेला. २६ हिंदू पर्यटकांचा केवळ त्यांच्या धर्मामुळे गोळ्या घालून खून केला. दहशतवाद्यांनी कलमा म्हणायला लावून, हा हल्ला नाही, तर भारतात धर्मयुद्ध पेटवण्याचा त्यांचा डाव होता. या हल्ल्याचं उद्दिष्ट स्पष्ट होतं... काश्मीरमधील शांतता उधळून लावणे, पर्यटनावर परिणाम करणे, आणि बेरोजगारी वाढवून स्थानिक तरुणांना पुन्हा दहशतवादाकडे ढकलणे. पण या वेळी एक नवं चित्र पाहायला मिळालं. पहलगाममध्ये स्थानिकांनी मेणबत्ती मोर्चा काढला. काश्मीरमध्ये उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. गेल्या ४० वर्षांत कधी नव्हतं ते घडलं. स्थानिक मुस्लिम जनतेनं दहशतवादाचा निषेध केला.


?si=XDn5cvqr96Q-I7FF

ते ठीक आहे पण आता प्रश्न आहे, या घटनेनंतर आता भारत काय उत्तर देणार? कारण, सुरुवातीच्या तपासातच पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आलेय. एनआयएला अमेरिकन एम-४ रायफल्सच्या पुंगळ्या, चिनी बनावटीच्या गोळ्या मिळाल्या. हे काही सहज मिळत नाही. पाकिस्तानचा दहशतवादाला पाठिंबा आणि चीनचा टेक्निकल सपोर्ट हे चित्र स्पष्ट आहे. यामुळे पाकिस्तान आणि चीन यांचा संबंध पुन्हा स्पष्ट झालाय. पाकिस्तानची आर्थिक स्थिती ढासळलेय. त्यामुळेच तो चीनच्या हातचा बाहुला बनलाय. चीनच्या इशा-यावर तो खेळतोय. भारताशी थेट लढण्याची हिंमत नसल्याने अशा कपटी हल्ल्यांमधून आपल्या अशांतीचे स्वप्न पूर्ण करण्याचा पाकिस्तान प्रयत्न करत आहे.



पण भारतही आता जुना नाही राहिला. २०१६ ला उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक केला. २०१९ ला पुलवामा हल्ल्यानंतर एअर स्ट्राईक करुन या दोन्ही वेळेस मोदी सरकारनं पाकिस्तानला ‘जशास तसे’ उत्तर दिलं होतं. आज पुन्हा तीच वेळ आलीय. देशवासीयांची एकच अपेक्षा आहे.. या वेळीसुद्धा मोदी सरकार पाकिस्तानची खुमखुमी ठेचून काढेल. दहशतवादाच्या या विळख्यातून काश्मीर पूर्णपणे बाहेर यायला हवं आणि त्यासाठी निर्णायक पावलं उचललीच पाहिजेत.

Comments
Add Comment

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला

आधार कार्ड पुन्हा एकदा बदलणार

नाव असेल ना पत्ता, फोटोसोबत असेल क्युआर कोड नवी दिल्ली : सर्व आर्थिक व्यवहारांसाठी आधारकार्डशिवाय पर्याय नाही.

वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी १० पट जास्त शुल्क

ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० रुपये नवी दिल्ली : केंद्र सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग

रशिया भारताला एसयू - ५७ लढाऊ विमाने देणार

मॉस्को : रशियाने भारताला एसयू-५७ स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्यास सहमती दर्शवली आहे. रशियन कंपनी रोस्टेकचे सीईओ

जवाद सिद्दिकीला १३ दिवसांची ईडी कोठडी

नवी दिल्ली :  दिल्लीतील एका न्यायालयाने बुधवारी अल फलाह विद्यापीठाचे प्रमुख व संस्थापक जवाद अहमद सिद्दिकी यांना

नितीश कुमार यांचा आज शपथविधी

दोन्ही उपमुख्यमंत्री भाजपचेच नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत जनता दल संयुक्त (जेडीयू) आणि भाजपने