Summer Footwear : उन्हाळ्यात स्टायलिश फुटवेअर खरेदी करताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा

उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात घट्ट शूजऐवजी सँडल (Sandals) घालणे खरोखरच आरामदायक आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये शरीराला थंड ठेवण्यासाठी योग्य कपड्यांबरोबरच योग्य फुटवेअर देखील महत्त्वाचे आहे. उन्हाळा येताच हवामानात बदल होतो, उन्हाळी कपड्यांबरोबरच चप्पल-सँडलची (Footwear) योग्य निवड केल्यास आरामदायी फिल यतो. अत्यधिक घाम आणि उष्णतेमुळे पायांची त्वचा ऍलर्जी, इन्फेक्शन किंवा दुर्गंधीची समस्या होऊ शकते. पण, उन्हाळ्याच्या दिवसांसाठी एक परफेक्ट सँडल खरेदी करणं, तितकं सोपं काम नाही. सँडल खरेदी करताना लोक महत्त्वाच्या चुका करतात आणि नंतर पश्चात्ताप करत बसतात, असं सर्वसाधारणपणे दिसून येतं. उन्हाळ्यात योग्य चप्पल-सँडल खरेदी करताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या याविषयी जाणून घेऊया.




१. वापर :


नक्की कशासाठी वापरणार आहात ते आधी ठरवा आणि खरेदी करण्यापूर्वी विचार करा की, ते तुम्ही कुठे वापरणार आहात. म्हणजे फॉर्मल इवेंटसाठी किंवा घरी-बाहेर फिरताना घालण्यासाठी किंवा आणि कोणत्या प्रसंगी घालण्यासाठी. जर तुम्हाला रिलॅक्स वाटावं यासाठी सँडल खरेदी करायची असेल तर स्टायलिश टाचांच्या सँडलऐवजी तुम्ही कंफर्टेबल सँडल खरेदी करा. तुम्ही ऑफिस किंवा पार्टीसाठी खरेदी करत असाल तर फॉर्मल सँडल खरेदी करा. यामध्येसुद्धा बरेच ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील.




२. आरामदायक फुटवेअर :


उन्हाळ्यात पायांना घाम येणे आणि दुर्गंधीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे तुमच्या पायांना कम्फर्टेबल फूटवेअर निवडा. त्यासाठी अशा फुटवेअरची निवड करा ज्यामध्ये हवा खेळू शकेल. कम्फर्टेबल आणि श्वास घेणारी मटेरियल पायाला श्वास घेण्याची आणि घाम कमी होण्याची सुविधा देतात, यामुळे त्वचेला आराम मिळतो आणि पायांच्या इन्फेक्शनचा धोका कमी होतो.



३. चांगली पकड :


उन्हाळ्यात पाय घामाने ओली होतात, ज्यामुळे फुटवेअर घसरू शकते. यासाठी, फुटवेअर निवडताना त्याची पकड महत्त्वाची आहे. चांगली पकड असलेली फुटवेअर घातल्याने चालताना घसरण्याचा धोका कमी होतो आणि आपल्याला पाय घसरून पडण्याची भीती राहत नाही. तुमच्या पायाला सारखा घाण येत असेल तर शक्यतो तुम्ही हवं खिळती राहणारे ओपन चप्पल घ्या.




४. आकाराची विशेष काळजी :


चप्पलच्या आकाराची विशेष काळजी घ्या सँडल निवडताना फार घट्ट होणार नाही आणि लुजही राहणार नाही, याची काळजी घ्या. योग्य आकार आणि माप यात कसलीच तडजोड करू नका. जर तुम्ही तुमच्या पायाच्या आकारापेक्षा लहान चप्पल घेतलीत तर चालताना पायाला इजा होऊ शकते, मोठी झाली तर चालताना त्रास होतो, पाय दुखतात.




५. गुणवत्तेला प्रथम प्राधान्य :


नेहमी चांगल्या दर्जाच्या सँडल घ्या. तुम्ही खूप महाग सँडल विकत घेतलेच पाहिजे, असे नाही. पण स्वस्त सँडल खरेदी करून कंफर्टेबलशी तडजोड करू नका. सँडल घेतानाच कधीही सर्व बाजूने पाहायचं.

Comments
Add Comment

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

जागतिक प्रत्यारोपण क्रीडास्पर्धेत ईशान आणेकरचे घवघवीत यश

जलतरणात दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई ठाणे : अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, दाते यांच्यासाठी होणार्या

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

पंतप्रधान मोदींचा आज मणिपूर दौरा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरला भेट देणार आहेत, जिथे ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि एका

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड