भारताचा डिप्लोमॅटिक स्ट्राईक, पाकिस्तानच्या चिंतेत वाढ

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करुन २६ पर्यटकांना ठार केले. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानभोवतीचा फास आवळण्यास सुरवात केली आहे. भारताने पाकिस्तान विरोधात डिप्लोमॅटिक स्ट्राईक अर्थात राजनैतिक हल्ल्याची कारवाई सुरू केली आहे. यामुळे पाकिस्तानच्या चिंतेत वाढ झाली आहे.



भारताने अमेरिका, रशिया यांच्यासह वीस देशांच्या राजदूतांना बोलावून त्यांना पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केलेल्या कारवाईची माहिती दिली. याआधी भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला. अटारी सीमेवरुन भारत - पाकिस्तान दरम्यानचे येणे - जाणे बंद केले आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानच्या दिल्लीतील दुतावासाचे कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांना अती दक्षतेचा इशारा दिला आहे. या पाठोपाठ केंद्र सरकारने पाकिस्तान सरकारचे अधिकृत एक्स हँडल अर्थात ट्विटर हँडल ब्लॉक केले आहे.लवकरच पाकिस्तानशी संबंधित अनेक सोशल मीडिया अकाउंट भारतात ब्लॉक होणार असल्याचे वृत्त आहे. याआधी जुलै २०२२, ऑक्टोबर २०२२ आणि मार्च २०२३ मर्यादीत काळासाठी केंद्र सरकारने पाकिस्तान सरकारचे अधिकृत एक्स हँडल अर्थात ट्विटर हँडल ब्लॉक केले होते.



मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २५ भारतीय आणि एक नेपाळी असे एकूण २६ पर्यटक ठार झाले होते. अनेक पर्यटक जखमी झाले होते. हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनीच केल्याचे ठोस पुरावे भारताच्या हाती आले आहेत. यानंतर भारताने पाकिस्तानची वेगवेगळ्या पद्धतीने कोंडी करायला सुरुवात केली आहे.



भारताने गुरुवारी अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन, इटली, कतार, जपान, चीन, रशिया, जर्मनी, फ्रान्स आदी देशांच्या राजदूतांना साउथ ब्लॉक येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात बोलावले. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पहलगाम हल्ल्याची माहिती जी-२० देशांच्या राजदूतांना दिली. राजदूतांसोबतची परराष्ट्र मंत्रालयाची बैठक सुमारे ३० मिनिटे सुरू होती. या बैठकीआधी बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीची अर्थात कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक झाली. या बैठकीत पाकिस्तानची कोंडी करण्याचा निर्णय झाला.

भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला. अटारी सीमेवरुन भारत - पाकिस्तान दरम्यानचे येणे - जाणे बंद केले आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानच्या दिल्लीतील दुतावासाचे कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला. आता तर पाकिस्तानमधून वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आलेल्यांनाही २९ एप्रिल २०२५ पर्यंत देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Comments
Add Comment

PM Narendra Modi : ‘होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळा अस्वीकार्य’; लोकसभेत पंतप्रधान मोदींचा जगाला स्पष्ट संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणाव आणि युद्धस्थितीवर लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करताना

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचा पश्चिम आशियासाठी ३० विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, अनेक विमान कंपन्यांना पश्चिम आशियाई देशांमधील

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची काश्मिरात छापेमारी

श्रीनगर : दिल्लीतील लाल किला स्फोट प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआयए) ने आज, सोमवारी पहाटे काश्मीर

धक्कादायक! भारतीय वायुसेना कर्मचारी करत होता पाकिस्तानसाठी हेरगिरी; आसाममधून अटक

वायुसेना आणि राजस्थान गुप्तचर विभागाच्या संयुक्त पथकाने आसाममधील वायुसेना तळावर कार्यरत असलेल्या एका

मुस्लिम डॉक्टरने गुंगीचे इंजेक्शन देत केला हिंदू मुलीवर बलात्कार; मध्यप्रदेशातील संतापजनक घटना

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू तरुणीवर

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा