Pahalgam Terror Attack : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होणार? पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून राजनाथ सिंहांचा इशारा

नवी दिल्ली: पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात (Pahalgam Terror Attack) देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याविरुद्ध सरकार कोणतं पाऊल उचलते याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष आहे. यादरम्यान आज बुधवारी संरक्षण मंत्री राजधान सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी जनतेला संबोधित करताना, दहशतवादावर प्रहार केला जाईल अशी घोषणा केली.


काश्मीरच्या पहलगाममध्ये निशस्त्र पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवादी आणि त्यांच्या प्रमुखांना चोख प्रत्युत्तर देणार असे आश्वासन राजनाथ सिंह यांनी जनतेला दिले. ते पुढे असे देखील म्हणाले की, सरकार प्रत्येक आवश्यक आणि उपयुक्त पावलं उचलत आहेत. ज्यांनी ही घटना घडवून आणली त्यांच्यापर्यंतच नाही, तर ज्यांनी पडद्यामागे राहून हा हत्याकांड घडवून आणला त्यांच्यापर्यंतही पोहोचू, असा घणाघात देखील त्यांनी केला. राजनाथ सिंह यांचे हे वक्तव्य पाकिस्तानसाठी एक स्पष्ट इशाराच मानला जात आहे.



जोरदार प्रत्युत्तर मिळेल: संरक्षक मंत्री राजनाथ सिंह


राजनाथ सिंह आज बुधवारी जनतेला संबोधित करताना म्हणाले, "मी देशवासियांना आश्वासन देतो की, भारत सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलेल. भ्याड हल्ला करणाऱ्या लोकांपर्यंत तर आम्ही पोहोचू पण मागे राहून असं दुष्कृत्य करणाऱ्या त्यांच्या प्रमुखांना सुद्धा सोडणार नाही. भारत ही इतकी जुनी संस्कृती आणि इतका जुना देश आहे की, अशा दहशतवादी कृत्यांनी त्याला घाबरवता येणार नाही. यासाठी जबाबदार असलेल्या लोकांना लवकरच जोरदार प्रत्युत्तर मिळेल."

Comments
Add Comment

बलाढ्य भारताच्या तीन भूभागांवर टीचभर नेपाळचा दावा

१०० रुपयांच्या नोटेवर दाखवले भारताचे तीन भाग मुंबई : विशाल आणि बलाढ्य अशी जगाच्या नकाशावर ओळख असलेल्या

‘घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का ? ’

नवी दिल्ली : देशभर सुरू असलेल्या मतदार यादी पुनिरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर

पंतप्रधान मोदी कर्नाटक आणि गोव्याचा दौरा करणार, ७७ फुटी श्रीराम मूर्तीचे अनावरण करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार २८ नोव्हेंबर रोजी कर्नाटक आणि गोव्याला भेट देणार आहेत. सकाळी साडे

भारतात ॲपल कंपनीवर होणार दंडात्मक कारवाई

नवी दिल्ली : जगातील अग्रगण्य टेक कंपनी ॲपलला भारतात नवीन स्पर्धा कायद्यांमुळे मोठा दंड भरावा लागणा आहे. भारतीय

भारतीय क्रिकेटपटू पुजाराच्या मेहुण्याची आत्महत्या! बलात्काराचा आरोप अन् एका वर्षात जीवन संपवले, जाणून घ्या सविस्तर

राजकोट: भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील नातेसंबंधामुळे चर्चेत आला आहे.

झुबीन गर्गची 'हत्या'च! आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे विधानसभेत धक्कादायक वक्तव्य

गुवाहाटी: आसामचा सुप्रसिद्ध गायक झुबीन गर्गचा मृत्यू ही कुठलीही दुर्घटना नसून त्याची हत्या केली असल्याचा