नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी लाखो इच्छुकांचा सहभाग दिसून येतो. ही परीक्षा भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलिस सेवा (IPS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय महसूल सेवा, भारतीय व्यापार सेवा आणि इतर गट अ (A) आणि ब (B) केंद्रीय सेवांसारख्या प्रतिष्ठित पदांसाठी प्रवेशद्वार म्हणून घेण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत यूपीएससी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून महाराष्ट्राने बाजी मारली आहे. (UPSC CSE Result)
यंदाच्या यूपीएससी परीक्षेत उत्तरप्रदेश प्रयागराजयेथील शक्ति दुबे या विद्यार्थ्याने देशात पहिला क्रमांक पटकावला असून हर्षिता गोयल देशात दुसरी आली आहे. तर महाराष्ट्राचा अर्चित डोंगरेने देशात तिसरा क्रमांक पटकावत बाजी मारली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) २०२४ च्या नागरी सेवा परीक्षामध्ये नियुक्तीसाठी एकूण १,००९ उमेदवारांची निवड केली आहे. या उमेदवारांना भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय पोलिस सेवा (IPS) आणि इतर केंद्रीय सेवा (गट अ आणि ब) या पदांवर नियुक्त केले जाईल. निवडलेल्या उमेदवारांमध्ये विविध श्रेणीतील उमेदवारांचा समावेश आहे, ज्यामध्ये सामान्य श्रेणीतील ३३५, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS), ३१८ इतर मागासवर्गीय (OBC), १६० अनुसूचित जाती (SC) आणि ८७ अनुसूचित जमाती (ST) यांचा समावेश आहे. (UPSC CSE Result)
अपंग व्यक्ती (PWBD) श्रेणी अंतर्गत एकूण ४५ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे, त्यापैकी १२ उमेदवार PWBD-१ (दृष्टीहीन), ८ उमेदवार PWBD-२ (श्रवणहीन), १६ उमेदवार PWBD-३ (गतिशीलता कमजोरी) आणि ९ उमेदवार PWBD-५ (इतर अपंगत्व) आहेत.
यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना प्रथम यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर, होमपेजवरील “नवीन काय आहे” विभाग किंवा थेट “निकाल” लिंकवर क्लिक करा. त्यानंतर, नागरी सेवा परीक्षा (CSE) निकालाच्या लिंकवर क्लिक करा. येथे तुम्हाला एक PDF फाइल मिळेल ज्यामध्ये उत्तीर्ण उमेदवारांची नावे आणि रोल नंबर असतील. तुम्ही तुमचे नाव किंवा रोल नंबर शोधून निकाल पाहू शकता.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…