Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी उमेद देतो.जगभरात स्वामींचे असंख्य भक्त आहेत आणि ते आपल्या सोबत आहेत याची प्रचिती ते सर्वाना करून देतातच. स्वामींचे आशीर्वाद घेण्यासाठी भक्त मठात जात असतात. स्वामींचे आशीर्वाद घेण्यासाठी मठात गेलेल्या अभिनेत्रीच्या पतीला देखील विलक्षण अनुभव आला, तो त्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेत्री अभिज्ञा भावे हिचा नवरा मेहुल पै याला स्वामींच्या मठात गेल्यानंतर एक वेगळाच अनुभव आला. त्याने सोशल मीडियावर आलेला अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. सध्या महुल याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे… त्याच्या पोस्टवर स्वामी भक्त देखील ‘श्री स्वामी समर्थ’ म्हणत कमेंट करत आहे.

मेहुल आलेला अनुभव सांगत म्हणाला, आजचा माझा दिवस आणि अनुभव,,,19 एप्रिल 2025… आजचा दिवस खूप वेगळा आणि अंतर्मुख करणारा होता. मी मठात गेलो होतो आणि पायऱ्या चढत असताना एक वृद्ध आजोबा भेटले. त्यांच्या हातातली एक साधी प्लास्टिकची पिशवी मला धरायला दिली. त्यांच्या हालचालींत एक अशक्तपणा जाणवत होता… आणि तेव्हा जाणवलं, कदाचित त्यांना Parkinson चा त्रास असावा. ते अत्यंत श्रद्धेने म्हणाले, “मी आधी स्वामींच्या पायांपडतो, मग माझी बॅग धरतो… आता तू पायांपड.” त्या शब्दांतली त्यांच्या भक्तीची ताकद आणि समर्पण मनाला स्पर्शन गेलं. मग आम्ही एकत्र सगळ्या देवांचे दर्शन घेतले.



दर्शनानंतर ते उपासनेला बसले. शांत, गूढ आणि स्थिर नजरेतून त्यांनी विचारलं, “थोडा वेळ थांबशील का मी उपासना करे पर्यंत ? मी थांबलो… आणि त्या क्षणात एक न सांगता येणारा आत्मिक संवाद झाला. उपासना झाल्यावर आम्ही बाहेर आलो. त्यांनी खूप आपुलकीने विचारलं, “घरी कोण-कोण आह रे तुझ्या ?” मी प्रेमाने सगळं सांगितल्यावर, ते म्हणाले, “येत्या 24 एप्रिलला बायकोला पुरणपोळी करायला सांग… आणि मग परत मठात ये. इथेच स्वामींपुढे ती ठेव. आणि बघ… लवकरच तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील.” थोड्या वेळाने, ते हसत म्हणाले, “तू कुठे चाललायस?” आणि शेवटी हळुवारपणे विचारलं -“थोडं पुढे रस्ता क्रॉस करून देशील का?”

असं झालं आज स्वामींचं दर्शन… एक साधा वाटणारा प्रसंग… पण मनाच्या आत खोलवर स्पर्श करून गेला. कधी कधी अनोळखी व्यक्तीकडून मिळणारी आपुलकी, रक्ताच्या नात्यांपेक्षा अधिक खरी वाटते… “स्वामींच्या चरणांशी जोडले गेलेले काही क्षण, मनात आयुष्यभरासाठी घर करून जातात… आणि त्यांची कृपा कोणत्या रूपात भेटेल, हे कधीच सांगता येत नाही.” सध्या मेहुल पै याची पोस्ट चर्चेत आहे.

Comments
Add Comment

Raj Kundra : 'जीव संपवण्याचा विचार'; आर्थर रोड जेल, घटस्फोटाची अफवा अन् शिल्पाच्या एका फोन कॉलचा 'तो' किस्सा; राज कुंद्राचा खुलासा

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) २०२१ मधील पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे

Govinda And Sunita Ahuja : सुनीता आहुजा फॅमिली कोर्टाबाहेर? सुखी संसारात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री

मुंबई : अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून

Zindagi Na Milegi Dobara 2 : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सिक्वेल येणार

मुंबई : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलची (पुढील भागाची) वाट

Aawarapan 2 : ‘आवारापन २’ची दमदार कमाई; ‘बंटवारा १९४७’ला फटका

मुंबई : १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या इम्रान हाश्मीच्या 'आवारापन २' आणि सनी देओलच्या 'बंटवारा १९४७' यांच्यातील

Shah Rukh Khan : नागपंचमीच्या दिवशी ‘मन्नत’मध्ये दोन सापांची एन्ट्री; एकाची सुखरूप सुटका, दुसरा बेपत्ता!

Mumbai : मुंबईतील बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे येथील प्रसिद्ध ‘मन्नत’ निवासस्थानी नागपंचमीच्या दिवशीच

Sunny Deol : सनी देओलच्या ‘बटवारा १९४७’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; विकेंडला केली जोरदार कमाई, २३ चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले!

सनी देओल (Sunny Deol) आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा ‘बंटवारा १९४७’ (Batwara 1947) हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी