हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची झोड उठली आहे. विरोधकांनी या निर्णयावर नाराजी जाहीर केली असून, सरकारला लक्ष्य केले आहे. दरम्यान अखेर राज्य सरकारने या निर्णयावर एक पाऊल मागे घेतले आहे. हिंदी शिकणे अनिवार्य नसून, ऐच्छिक ठेवणार असल्याचा खुलासा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केला आहे. ते मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.


हिंदीच्या सक्तीवर ते म्हणाले की, ‘हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये केंद्राकडून काही थोपवले जात असल्याची जी चर्चा सुरु आहे, तसे काही नाही. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार भाषेच्या संदर्भातला जे काय आहे, त्यात तीन भाषेचे सूत्रीकरण केले आहे. तुमच्यावर थोपविले जात आहे असे कुठेही लिहिले नाही. ९ सप्टेंबर २०२४ ला सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये तृतीय भाषा हिंदी म्हणून समावेश करण्याचा निर्णय झाला अशी माहिती त्यांनी दिली.



मराठी भाषा अनिवार्य आणि अंमलबजावणी कशी केली जाईल, हे आधीच सांगितले आहे. मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या व्यतिरिक्त बंगाली, उर्दू, हिंदी, ज्या इतर शाळा आहेत. त्या भाषेला प्राधान्य देतात. मराठी बंधनकारक आहे आणि तिसरी इंग्रजी नाहीतर अन्य निवडतात. अशाप्रकारे तीन भाषांचे शिक्षण दिले जाते. आपण इंग्रजी स्विकारले आहे, पण हिंदी का? याचे उत्तर देतो. आपल्या मुलांना सोप्या पद्धतीने शिकायला होईल, देवनागरी लिपी समान आहे. शिक्षकांना हिंदी शिकवणे अवघड नाही, असे ते म्हणाले.


राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये हिंदीचा बहुभाषिक म्हणून पुरस्कार केला आहे. हिंदी अभिषेक केंद्र शासनाने बंधनकारक केले नाही. आपल्या राज्याच्या सुकाणू समितीने पहिली मराठी, दुसरी इंग्रजी. तृतीय भाषा म्हणून हिंदी त्या ठिकाणी स्वीकारली आहे. याच गोष्टीच्या आधारावर शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. हिंदी शिकणे ऐच्छिक ठेवणार आहोत. पहिली मराठी, दुसरी इंग्रजी आणि तिसरी हिंदी ऐच्छिक आहेत त्यांनाच शिकवली जाईल.हिंदी बाबतचा पुढचा शासन निर्णय सुधारित लवकरच जारी केला जाईल. इतर भाषेसंदर्भात त्या वर्गातून किती विद्यार्थ्यांची मागणी येते. त्याचा अभ्यास करुन निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

Raigad News : रायगड जिल्ह्यात नियम पूर्तता करणाऱ्या दगडखाणींना उत्खननाची परवानगी: महसूल मंत्री

मुंबई :  आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या खाणींना सरसकट बंदी न घालता उत्खननासाठी परवानगी द्यावी, मात्र

Deputy Collectors : राज्यातील ५१ तहसीलदार होणार उपजिल्हाधिकारी

महसूल विभागात हालचाली; 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हुकणार? मुंबई :

Mankhurd : मानखुर्द येथील सरकारी जमिनीवरील बाराशे अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा, तब्बल अकरा एकर जमीन अतिक्रमणमुक्त उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश

निष्कासित जागांवर विधायक उपक्रम, नागरिकांसाठी उभारणार अत्याधुनिक 'विज्ञानपार्क' मुंबई

ST Buses Tickets Rate : उन्हाळ्यात प्रवाशांना झटका; ST तिकिट दरात वाढ जाहीर

मुंबई : उन्हाळी सुट्टी सुरु झाली आहे आणि प्रत्येकजण आपल्या गावी किंवा बाहेरगावी जाण्यासाठी वेगवेगळ्या

BMC News : पाणी साचणाऱ्या ठिकाणांपासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले निर्देश मुंबईतील मिठी नदीसह नाल्यांची भिडे यांनी

Png And Lpg Gas Cylinder : PNG असेल तर LPG होणार बंद? 1 जुलैपासून या नव्या नियमांची होणार अंमलबजावणी

मुंबई : घरगुती गॅस वापराबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वाचे बदल लागू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत