साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख रुपये केली जाणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. मालगुंड (ता. रत्नागिरी) येथे त्यांच्या उपस्थितीत आज मालगुंड हे पुस्तकांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

श्री. सामंत म्हणाले, कोकणाने महाराष्ट्राला जेवढे साहित्यिक दिले, तेवढे कोणत्याच प्रांताने दिले नाहीत. कोकण आणि रत्नागिरी साहित्याच्या दृष्टीने प्रगत आहे. ते साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण सर्वांनी केले, तर ती खऱ्या अर्थाने केशवसुतांना श्रद्धांजली ठरेल, असेही ते म्हणाले. मालगुंडच्या कवी केशवसुत स्मारकाच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तकांचे गाव उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमात मालगुंडमधील ३०, तर जवळच्या गणपतीपुळे गावातल्या पाच घरांचा समावेश करण्यात आला आहे. या घरांमध्ये पुस्तकं ठेवली जाणार आहेत. त्यापैकी दोन दालनांचे आज प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन झाले. या दालनांमध्ये पर्यटकांना दिवसभर वाचनाचा आनंद घेता येणार असून, त्यांच्या आदरातिथ्यातून संबंधित कुटुंबांच्या अर्थार्जनालाही हातभार लागणार आहे.

मालगुंड हे कवितेचे गाव झाल्यामुळे ते जगाच्या नकाशावर येणार आहे, अशी प्रातिनिधिक भावना यावेळी मान्यवरांकडून व्यक्त झाली.

कोकणातील साहित्यिकांची माहिती देणाऱ्या कोकणसाहित्य सन्मान दालनाचे उद्घाटनही या वेळी झाले. समारंभाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक मधू मंगेश कर्णिक, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, कवी अरुण म्हात्रे, नाटककार गंगाराम गवाणकर, मराठी भाषा विकास संस्थेचे डॉ. श्यामकांत देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

Revenue Minister Bawankule : अनेकदा व्हरांड्यात झोपलो पण हार मानली नाही..! महसूलमंत्री बावनकुळे आमदार निवासातील आठवणींत रमले

सुरक्षा रक्षक ते स्वीपर... सर्वांची आस्थेने विचारपूस मुंबई : राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात महसूलमंत्री

Pune News : थेट जमिनीवर आपटल्या अन्...; वॉटरपार्कमधील कमी पाणी महिलेच्या जीवावर बेतले, आयुष्यभराचे अपंगत्व

पुणे : वाढत्या उन्हाळ्यामुळे थंड पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले वॉटरपार्ककडे वळत असतानाच, शिरूर

Deputy Chief Minister Eknath Shinde : एकनाथ शिंदे शिवसेनेत ‘भाकरी’ फिरवणार?

अकार्यक्षम नेत्यांना दाखवणार घरचा रस्ता; मंत्र्यांपासून शाखाप्रमुखांचे ‘रिपोर्ट कार्ड’ तयार होणार मुंबई :

Ancient manuscripts : प्राचीन हस्तलिखिते मिळणार आता एका क्लिकवर

'ज्ञानभारतम्' मोहिमेला प्रारंभ; हस्तलिखितांच्या नोंदीसाठी पुणे-नागपूर मुख्य केंद्र मुंबई : भारताच्या प्राचीन

मित्रानं वाढदिवसाला न बोलावल्यानं २४ वर्षीय तरुणानं जीवन संपवलं अन्...

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुंबफेळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २४ वर्षीय तरुणानं

Chief Minister Devendra Fadnavis : व्हिएतनामची महाराष्ट्रात ८.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; उद्योग विभाग आणि ‘एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार मुंबई :