नागपूर : भारतात सगळीकडेच उष्णतेची लाट पसरली असून हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांत राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भातील अनेक भागात अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र महाराष्ट्रातील नागपूरमध्ये सर्वाधिक तापमान असल्याचे म्हटले जात आहे.
जानेवारी महिना ओसरला की उष्णतेच्या लाटांना सामोरे जावे लागते. कडाक्याच्या उन्हात अनेकांची प्रकृती देखील खालावते आहे. महाराष्ट्रात सगळीकडेच उन्हाचा प्रहार होत आहे तुलनेने जास्त तापमान नागपूरमध्ये नोंदवल गेल आहे. आजपासून येत्या तीन दिवसात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये प्रचंड उष्ण हवामान राहणार आहे. तर पुणे, सोलापूर जिल्ह्यातही आज उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आहारात फळांचा समावेश करणे गरजेचे आहे.
नागपूर – ४४.७°C
परभणी – ४३.६°C
चंद्रपूर – ४४.०°C
ब्रम्हपुरी – ४३. ६°C
वर्धा – ४३.०°C
गोंदिया – ४४.०°C
अमरावती –४३.८°C
यवतमाळ – ४२. ५°C
वाशीम – ४१ . ८°C
अकोला – ४३.५°C
बुलढाणा – ४०.०°C
औरंगाबाद – ४१.७°C
जळगाव – ४१.७°C
लातूर – ४१.२°C
बीड – ४२.६°C
हिंगोली – ४२.१°C
पुणे – ३९.४°C
नाशिक – ३७.३°C
सातारा – ३९.७°C
सांगली – ३७.१°C
मुंबई उपनगर – ३३.०°C
मुंबई शहर – ३३.४°C
ठाणे – ३६.०°C
पालघर – ३५.२°C
रत्नागिरी – ३२.९°C
सिंधुदुर्ग – ३२.०°C
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…