
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब चर्चेत असते. आता देखील एका मोठ्या कारणामुळे खान कुटुंब चर्चेत आहे. प्रसिद्ध इंटेरियर डिझायनर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी गौरी आता तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत आली आहे. तिच्या व्हायरल झालेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला जम्मूहून दिल्लीसाठी ...
शनिवारी रात्री झालेल्या एका कार्यक्रमात गौरी खानच्या लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमासाठी गौरीने काळ्या रंगाचे कपडे घातले होते. गौरी खानने यावेळी प्रसिद्ध ब्रँड टॉम फोर्डच्या स्लीक ऑल-ब्लॅक आउटफिटमध्ये चाहत्यांना फॅशनचा जलवा दाखवण्याचा प्रयत्न केला. पण ही कृती गौरीला भोवली.
गौरीच्या काळ्या पारदर्शक टॉपमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. फोटोवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘हिच्याकडे चांगले कपडे घेण्यासाठी पैसे नाहीत का?’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘गौरी खान कडून अशी अपेक्षा नव्हती…’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘स्टार असे कपडे का घालतात…’ काही दिवसांपूर्वी गौरी खान तिच्या मालकीच्या हॉटेलमुळे चर्चेत आली होती. ग्राहकांना भेसळयुक्त पनीर दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता गौरी कपड्यांमुळे चर्चेत आहे.