Star Pravah vs Sony Marathi : स्टार प्रवाह आणि सोनी मराठीमध्ये टक्कर!

'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो


मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका येत आहेत. तरी स्टार प्रवाह ही वाहिनी सगळ्यात पुढे आहे. आठवड्याभरात 'कोण होतीस तू काय झालीस तू' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. त्याबरोबर स्टार प्रवाहने आणखी एक कार्यक्रम घोषीत केला आहे. यात स्टार प्रहारवर नवीन मालिका येत आहे "शिट्टी वाजली रे" यामध्ये लोकप्रिय कलाकार स्वयंपाक बनवताना आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. "शिट्टी वाजली रे" या मालिकेमध्ये हिंदी आणि मराठी कलाकार काम करताना दिसणार आहेत.

ही मालिका स्टार प्रवाहवर २६ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दर शनिवार-रविवार रात्री ९ वाजता हा नवा शो प्रेक्षकांना पाहता येणार आहे. अशातच ‘शिट्टी वाजली रे’ला टक्कर देण्यासाठी ‘सोनी मराठी’ने नव्या कुकिंग शोची घोषणा केली आहे. ‘आज काय बनवू या?- मधुरा स्पेशल’, असं ‘सोनी मराठी’च्या नव्या शोचं नाव आहे.



लोकप्रिय युट्युबर मधुरा बाचल या ‘आज काय बनवू या?- मधुरा स्पेशल’ च्या होस्ट असणार आहेत. मधुरा बाचल या युट्युब चॅनेलमुळे लोकांच्या घरोघरी पोहोचल्या, याआधी त्यांनी अनेक कुकिंग शोमध्ये होस्ट केले आहे. आता त्या छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. या कार्यक्रमात त्या निरनिराळ्या रेसिपी करून प्रेक्षकांना दाखवणार आहे. सोनी मराठीने नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमोमध्ये मधुरा म्हणते, 'आपल्या किचनमध्ये नाही आगीचा खेळ, पारंपरिक स्वयंपाकाचा रंगणार चविष्ट मेळ, फोडणी नात्यात नाही तेलात टाकणार, किचनमध्ये कशाला हवी सेलिब्रिटींची जोडी स्वयंपाकघरात ड्रामा कशाला हवा... महाराष्ट्रातल्या पाककृती शिकून नव्या... रुचकर चवींची पंगत रंगवू या... अतूट नाती विणू या...!'

किचनमध्ये कशाला हवी सेलिब्रिटींची जोडी यामधून सोनी मराठी अप्रत्यक्षरीत्या स्टार प्रवाहला टोमणा मारत असल्याचं दिसून येत आहे. ५ मेपासून हा नवा शो सुरू होणार आहे. सोमवार ते शुक्रवार दुपारी १ वाजता ‘आज काय बनवू या?- मधुरा स्पेशल’ हा शो पाहायला मिळणार आहे. आता प्रेक्षक या कार्यक्रमाला कसा प्रतिसाद देणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.
Comments
Add Comment

Prasad Oak : महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये प्रसाद ओकच्या नव्या लूकची चर्चा, लवकरच झळकणार 'या' भूमिकेत

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात अत्यंत लोकप्रिय असलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सध्याच्या

Purnimecha Phera : रहस्यमय 'पौर्णिमेचा फेरा सिझन ३’ वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर धूमाकूळ

मुंबई : मराठी सिनेविश्वात आपल्या आगळ्यावेगळ्या कथानकाने आणि सस्पेन्स-थ्रिलरच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर

Rashmika-Vijay Reception : कुर्गमध्ये पार पडला रश्मिका-विजयचा दुसरा ग्रँड रिसेप्शन सोहळा, रश्मिकाला मिळालं 'हे' कोट्यवधींच सरप्राइज

साऊथबरोबरच संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेली जोडी म्हणजेच अभिनेता विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना

Lata Deenanath Mangeshkar Award : यंदा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार'ने कैलाश सत्यार्थी सन्मानित

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०२६ यंदा नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना जाहीर करण्यात आला आहे.

Bigg Boss Marathi Ticket To Finale: अखेर 'ही' सदस्य ठरली पहिली फायनलिस्ट, 'तिकीट टू फिनाले'च्या टास्कमध्ये मारली बाजी

मुंबई : बिग बॉस मराठी ( Bigg Boss Marathi ) सीझन ६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले असून अनेक टास्क आणि आव्हानं पार करुन घरातील ७

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम दिशा वकानीच्या वडिलांचं निधन

मुंबई: टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील दयाबेनच्या भूमिकेसाठी ओळखली