Thursday, September 18, 2025

Star Pravah vs Sony Marathi : स्टार प्रवाह आणि सोनी मराठीमध्ये टक्कर!

Star Pravah vs Sony Marathi : स्टार प्रवाह आणि सोनी मराठीमध्ये टक्कर!

'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो

मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका येत आहेत. तरी स्टार प्रवाह ही वाहिनी सगळ्यात पुढे आहे. आठवड्याभरात 'कोण होतीस तू काय झालीस तू' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. त्याबरोबर स्टार प्रवाहने आणखी एक कार्यक्रम घोषीत केला आहे. यात स्टार प्रहारवर नवीन मालिका येत आहे "शिट्टी वाजली रे" यामध्ये लोकप्रिय कलाकार स्वयंपाक बनवताना आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. "शिट्टी वाजली रे" या मालिकेमध्ये हिंदी आणि मराठी कलाकार काम करताना दिसणार आहेत. ही मालिका स्टार प्रवाहवर २६ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दर शनिवार-रविवार रात्री ९ वाजता हा नवा शो प्रेक्षकांना पाहता येणार आहे. अशातच ‘शिट्टी वाजली रे’ला टक्कर देण्यासाठी ‘सोनी मराठी’ने नव्या कुकिंग शोची घोषणा केली आहे. ‘आज काय बनवू या?- मधुरा स्पेशल’, असं ‘सोनी मराठी’च्या नव्या शोचं नाव आहे.
लोकप्रिय युट्युबर मधुरा बाचल या ‘आज काय बनवू या?- मधुरा स्पेशल’ च्या होस्ट असणार आहेत. मधुरा बाचल या युट्युब चॅनेलमुळे लोकांच्या घरोघरी पोहोचल्या, याआधी त्यांनी अनेक कुकिंग शोमध्ये होस्ट केले आहे. आता त्या छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. या कार्यक्रमात त्या निरनिराळ्या रेसिपी करून प्रेक्षकांना दाखवणार आहे. सोनी मराठीने नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमोमध्ये मधुरा म्हणते, 'आपल्या किचनमध्ये नाही आगीचा खेळ, पारंपरिक स्वयंपाकाचा रंगणार चविष्ट मेळ, फोडणी नात्यात नाही तेलात टाकणार, किचनमध्ये कशाला हवी सेलिब्रिटींची जोडी स्वयंपाकघरात ड्रामा कशाला हवा... महाराष्ट्रातल्या पाककृती शिकून नव्या... रुचकर चवींची पंगत रंगवू या... अतूट नाती विणू या...!' किचनमध्ये कशाला हवी सेलिब्रिटींची जोडी यामधून सोनी मराठी अप्रत्यक्षरीत्या स्टार प्रवाहला टोमणा मारत असल्याचं दिसून येत आहे. ५ मेपासून हा नवा शो सुरू होणार आहे. सोमवार ते शुक्रवार दुपारी १ वाजता ‘आज काय बनवू या?- मधुरा स्पेशल’ हा शो पाहायला मिळणार आहे. आता प्रेक्षक या कार्यक्रमाला कसा प्रतिसाद देणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.
Comments
Add Comment