Nashik : नाशिकमध्ये हिंसा, ३८ अटकेत; MIM च्या शहराध्यक्षाला अटक आणि मविआचे पदाधिकारी फरार

  106

नाशिक : नाशिक - पुणे मार्गावरील काठे गल्ली सिग्नलजवळ असलेल्या अनधिकृत दर्ग्यावर महापालिका प्रशासनाने कारवाई केली. अनधिकृत बांधकाम प्रकरणी दर्ग्याच्या व्यवस्थापनाला कायद्यानुसार महापालिकेने नोटीस बजावली होती. पण महापालिकेने कारवाई सुरू करताच मुसलमानांनी घटनास्थळी जमून पोलिसांवर दगडफेक केली. कारवाईला विरोध करण्यासाठी दंगल करण्यात आली. पोलिसांवर हल्ले करण्यात आले. या प्रकरणी आतापर्यंत ३८ जणांना अटक करण्यात आली आहे. ज्या भागात दंगल झाली तिथे पोलीस बंदोबस्त ठेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. दंगल प्रकरणाचा तपास सुरू आहे. कारवाईला विरोध करण्यासाठी अल्पावधीत मोठा जमाव आला कसा आणि सतत हल्ले करण्यासाठी दगड आणि शस्त्रे आली कुठुन ? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी हिंसाचार प्रकरणी एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेखला अटक केली आहे. काँग्रेस पदाधिकारी हनीफ बशीर, उद्धव गटाचे निलोफर शेख आणि शरद पवार गटाचे आरिफ हाजी नॉट रिचेबल झाले आहेत.

नाशिकमधील हिंसेप्रकरणी १५०० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींमध्ये काँग्रेस पदाधिकारी हनीफ बशीर, उद्धव गटाचे निलोफर शेख आणि शरद पवार गटाचे आरिफ हाजी यांचाही समावेश आहे. या आरोपींच्या विरोधात कट रचणे, अफवा पसरवणे, प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष हिंसाचार घडविण्यात सहभाग असल्याचा आरोप ठेवून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दर्ग्यावरील कारवाईला विरोध म्हणून पोलिसांवर हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्यांमध्ये २१ पोलीस जखमी झाले होते. अनेक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले होते. दंगल करणाऱ्यांनी ३० वाहनांची नासधूस केली. घातक शस्त्रे, लाठ्या-काठ्या, दगड, विटा आणि फरशांनी पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात मोबाइल व्हिडीओ, परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या