Friday, May 9, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Mumbai : बसमध्ये तरुणीचा विनयभंग, इरफान शेखला अटक

Mumbai : बसमध्ये तरुणीचा विनयभंग, इरफान शेखला अटक
मुंबई : प्रभादेवी – कुरणे चौक मार्गावरील बेस्टच्या बस क्रमांक १६७ मधून प्रवास करत असलेल्या तरुणीचा विनयभंग करण्यात आला. चालत्या बसमध्ये ही घटना घडली. या प्रकरणात इरफान हुसेन शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी इरफान शेख हा वांद्रे येथील रहिवासी आहे.



गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, १० एप्रिल रोजी सकाळी इरफानने चालत्या बसमध्ये तरुणीचा विनयभंग केला. तरुणीने वरळी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार केली. या तक्रारीआधारे संबंधित मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासण्यात आले. यानंतर इरफान शेख याला अटक करण्यात आली आहे.
Comments
Add Comment