Tuesday, May 13, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Navi Mumbai Metro : नवी मुंबईतून अर्ध्या तासात पोहोचणार मुंबईत! दोन्ही एअरपोर्ट मेट्रोला जोडणार

Navi Mumbai Metro : नवी मुंबईतून अर्ध्या तासात पोहोचणार मुंबईत! दोन्ही एअरपोर्ट मेट्रोला जोडणार

'असा' असेल मार्ग  


मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडीची (Mumbai Traffic) समस्या कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुसाट आणि आरामदायी होण्यासाठी प्रशासन नेहमीच कार्यरत असते. नुकतेच मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर (ईस्टर्न एक्सप्रेस हायवे) १३.४ किमी लांबीच्या उन्नत रस्त्याचे बांधकाम सुरू झाले आहे. यामुळे मुंबई ते ठाणे प्रवास अवघ्या अर्ध्या तासात पार पडणार आहे. त्यानंतर आता नवी मुंबईकरांचा देखील मुंबई प्रवास अर्ध्या तासात पूर्ण होऊ शकणार आहे. (Navi Mumabi Metro)



मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोने विविध टप्प्यात २५ मेट्रो मार्ग प्रस्तावित केले आहे. त्यापैकी नवी मुंबईत सध्या पहिल्या टप्प्यातील बेलापूर ते पेंधरदरम्यान ११ किमी लांबीच्या मार्गावर प्रवासी सेवा सुरू झाली आहे. हा मार्ग वाढवून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्याची योजना सिडकोने केली आहे. मेट्रो मार्ग क्रमांक ८ हा ३५ किमी असून यात २५.६३ किमीचा उन्नत राहणार असून मुंबई विमानतळ ते छेडानगर दरम्यानचा ९.२५ किमी लांबीचा मार्ग भूमिगत असणार आहे.  या ३५ किमी लांबीच्या मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.



कशी असेल विमानतळ एक्स्प्रेस लाइन ३५?


मुंबई विमानतळ ते मानखुर्द अशी ११.१ किमी लांबीची मेट्रो लाइन ८ बांधण्यात येणार आहे. तर, सिडको मानखुर्द ते नवी मुंबई विमानतळ या मार्गाचा विस्तार करणार आहे. तसंच, हा मार्ग भुयारी असणार आहे. घाटकोपर येथील अंधेरी ते इस्टर्न एक्स्प्रेस हायवेपर्यंत हा भुयारी मार्ग असणार आहे. घाटकोपर ते मानखुर्द हा लिंक रोडने उन्नत करण्यात येणार आहे.



३० मिनिटांत अंतर कापता येणार 


नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर वाहतुकीच्या समस्येत वाढ होईल. नागरिकांनी वाहतूक कोंडीत अडकून बसू नये म्हणून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या मार्गामुळे मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ हे अंतर ३० मिनिटांत कापता येणार आहे. या मार्गावर दर २० ते ३० मिनिटांनी मेट्रो धावणार असून ७ स्थानके असणार आहेत.

Comments
Add Comment