Pune : पुण्यात चितळेंच्या नावाने ग्राहकांची फसवणूक, पोलिसांनी केली कारवाई

  102

पुणे : 'चितळे बंधू मिठाईवाले' हे नाव माहिती नसलेला पुणेकर सापडणे दुर्मिळ. पण चितळे या नावाच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेऊन फसवणूक करण्याचा प्रकार पुण्यातच घडला आहे. हा प्रकार उघड होताच पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली. फसवणुकीचा आरोप झाल्यानंतर सदाशिव पेठेतील 'चितळे स्वीट होम'च्या मालकावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.



स्वीय सहायक म्हणून चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडे चार वर्षांपासून नोकरी करत असलेल्या नितीन दळवी (वय ३५, रा. धनकवडी) यांनी तक्रार केली. यानंतर चितळे स्वीट होमचे मालक प्रमोद प्रभाकर चितळे यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (२), ३५० व आयटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अर्जाची चौकशी केल्यानंतर, या प्रकरणी बुधवारी गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.



नमकीन श्रेणीत चितळे बंधू मिठाईवाले यांची बाकरवडी लोकप्रिय आहे. पण काही ग्राहकांनी बाकरवडीची चव बदलल्याची तक्रार केली. हा प्रकार कळल्यावर चक्रावलेल्या नितीन दळवी यांनी बाजारात चौकशी सुरू केली. काही पाकिटे विकत घेऊन पाहणी केली. यावेळी चितळे नावाशी साधर्म्य साधणारा एक नवा ब्रँड बाजारात आल्याचे आणि हा ब्रँड ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

चितळे बंधू मिठाईवाले यांची बाकरवडी आणि चितळे स्वीट होम यांची पुणेरी स्पेशल बाकरवडी या दोन्हीत तफावत आहे. पण पॅकिंगवर चितळे बंधू मिठाईवाले यांचा अधिकृत ई-मेल आयडी, ग्राहक क्रमांक (कंझ्युमर नंबर), मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स, संपर्क क्रमांक छापला होता. हा प्रकार करुन चितळे स्वीट होम हे त्यांची बाकरवडी ही चितळे बंधू मिठाईवाले यांचीच बाकरवडी असल्याचे भासवून विकत होते. या प्रकरणात अधिकृत ब्रँडच्या माहितीचा गैरवापर सुरू असल्याची स्वतंत्र तक्रार चितळे बंधू मिठाईवाले यांचे भागीदार इंद्रनील चितळे यांनी पुणे पोलिसांकडे नोंदविली आहे.

d
Comments
Add Comment

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग