परमेश्वराचे स्थान आपल्या जीवनात प्रचंड आहे व परमेश्वराबद्दलचे अज्ञान हे माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरते असा सिद्धांत जीवनविद्येने सिद्धांत मांडलेला आहे. परमेश्वर आहे कसा, तो काय करतो, तो आहे कुठे या अशा गोष्टींचा उहापोह केला, तर आपल्याला असे आढळून येईल की, परमेश्वरबद्दल कितीही बोललो तरी कमीच. मला तर परमेश्वर हा विषय इतका आवडतो की, या विषयावरच बोलत राहावे असे वाटते. मी लोकांना नेहमी सांगतो परमेश्वरावर प्रेम करा, मनापासून प्रेम करा. आता परमेश्वरावर प्रेम कसे करायचे हा प्रश्न लोकांना पडतो. तो डोळ्यांना दिसत नाही, तर त्याच्यावर प्रेम कसे करणार ? त्यासाठी आई, वडील, गुरू, सद्गुरू, पती, पत्नी, यांपैकी कुणावरही तुम्ही प्रेम करू शकता. कुठे तरी एका ठिकाणी त्याला पाहायला शिका. सर्व ठिकाणी त्याला पाहणे कठीण जाते. दिसेल तो परमेश्वर. दिसेल तो परमेश्वर ही वस्तुस्थिती आहे, पण ते सतत पाहणे कठीण आहे. कुठे तरी एका ठिकाणी पाहायचे तर सद्गुरूंच्या ठिकाणी पाहणे जास्त चांगले, कारण सद्गुरू जे देतात ते इतर देत नाहीत. सद्गुरू जे काही देतात ते इतर देत नाहीत, सद्गुरू आपल्याला किती महत्त्वाचे काय देतात ते कळायलाही अक्कल लागते. सद्गुरू देवापेक्षाही श्रेष्ठ का तर सद्गुरू देव देतात म्हणून. देतात म्हणजे दाखवितात, त्याचा अनुभव देतात.
हे मी सांगतो आहे कारण, परमेश्वर हा विषय आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे व तो समजावून घेतलाच पाहिजे. हा विषय जर समजावून घेतला नाही, तर पुरातन काळापासून आजतागायत जे चाललेले आहे ते तसेच चालत राहणार. आपण जर विचार केला, तर आपल्याला असे दिसून येईल की, दिवसेंदिवस परिस्थिती बिघडतच चाललेली आहे आणि ते सुद्धा देवाधर्माच्या नावाखाली हे विशेष. जीवनविद्या सांगते तुम्हाला जर देवच कळलेला नाही, तर तुमची धर्माची संकल्पना चुकते आणि धर्माची संकल्पना चुकली, तर संस्कृती ही विकृती होते. संस्कृती विकृती झाली की, तुमच्याकडून जे घडते ते पाप. हे पाप फळाला आले की, असते ती अशुभ नियती व पुण्य फळाला आले की, असते ती शुभ नियती. ही नियती आपण भोगत असतो त्यालाच सुखदुःख म्हणतात. या सुखदुःखाला लोक नशीब असे म्हणतात. असा हा सगळा
प्रवास आहे.
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…