Cash On Wheels : पंचवटी एक्सप्रेस एटीएम असलेली भारतातील पहिली ट्रेन!

मुंबई : ट्रेनमध्ये बसून तुम्ही एटीएममधून रोख रक्कम काढू शकता, हे ऐकून आश्चर्य वाटतंय ना? पण ही आता कल्पना नाही – हे आहे सत्य! होय, मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस भारतातील पहिली ट्रेन बनलीये जिथं बसवण्यात आलंय ‘एटीएम ऑन व्हील्स!’ नक्की काय आहे रेल्वेचा नवा उपक्रम, चला जाणून घेऊ या अधिक माहितीविषयी...


भारतीय रेल्वेच्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाअंतर्गत भुसावळ रेल्वे विभाग आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने हा एटीएमचा पहिला प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात आला आहे. हे एटीएम ट्रेनच्या एसी कोचमध्ये बसवण्यात आलंय, पण त्याचा उपयोग संपूर्ण २२ डब्यांमधील प्रवासी करू शकतात – कारण सगळे डबे वेस्टिब्यूलने जोडलेत. हे सगळे ठिक आहे पण एटीएम ट्रेनमध्ये चालत असताना काम करतंय का? तर हो!



चाचणीदरम्यान संपूर्ण प्रवासात हे मशीन सुरळीतपणे कार्यरत होतं. फक्त इगतपुरी ते कसारा दरम्यानच्या बोगद्यांमध्ये थोड्याशा नेटवर्क अडचणी होत्या, पण त्या अपवाद ठरल्या. या एटीएमचा वापर फक्त रोख रक्कम काढण्यासाठीच नाही, तर चेकबुक ऑर्डर, अकाउंट स्टेटमेंट मिळवणं यासाठीही करता येतो. आणि विशेष म्हणजे हाच एटीएम मुंबई-हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस मध्येही प्रवाशांसाठी उपलब्ध असेल!



सुरक्षिततेचीही पूर्ण खबरदारी घेतली असून एटीएममध्ये शटर सिस्टीम आहे आणि २४ तास CCTV कॅमेऱ्यांद्वारे देखरेख केली जाते. भविष्यात ही सुविधा प्रवाशांमध्ये लोकप्रिय झाली, तर ही योजना इतर गाड्यांमध्येही वाढवली जाणार आहे! त्यामुळे भारताच्या रेल्वेचा प्रवास आता केवळ मंजिलपर्यंत नाही, तर आधुनिकतेकडेही सुरू झालाय! कॅश ऑन व्हील्स हे फक्त नाव नाही, ही आहे भारतीय रेल्वेची एक क्रांती! आणि ही क्रांती सुरू झालेय आपल्या लाडक्या पंचवटी एक्सप्रेसपासून!

Comments
Add Comment

Teacher Suicide Case : सुनील मोरे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; दोन्ही मुलांसोबत केलं भयकंर नंतर...

शिक्षक सुनील मोरेंनी रचला बनवा; आत्महत्या पूर्वी दोन्ही लेकरांची हत्या, पोस्टमार्टम रिपोर्ट आले समोर Teacher Suicide Case :

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी