CM Devendra Fadnavis : 'कोणाला इंग्रजी शिकायची असल्यास...' भाषावादावर काय बोलले मुख्यमंत्री ?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात भाषावादाचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. परप्रांतीय लोकांचे मराठी बोलण्यावरुन अनेक वाद होत आहेत. दरम्यान मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असून आता राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या अनिवार्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे आता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे. शिक्षणाचा हा निर्णय चर्चेत असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मोठं वक्त्व्य केलं आहे.



छत्रपती शिवाजी टर्मिनस ते विमानतळ स्टेशन या विभागात एलिव्हेटेड आणि भूमिगत मेट्रोच्या संगमाचे काम एका कॉरिडॉरमध्ये होत आहे. या संगमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली असून त्यांनी पहिलीपासून मराठी, हिंदी, इंग्रजी शिकवण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.


''नवी शिक्षानिती ही आपण यापूर्वीच लागू केली आहे. त्यामुळे याबाबत कोणताही नवा निर्णय घेण्यात आला नाही. महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे. आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्कसूत्र तयार करण्याकरिता हिंदी ही एक संपर्कसूत्राची भाषा आहे. त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे असा प्रयत्न आहे. पण कोणाला इंग्रजी शिकायचं असल्यास इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषा शिकायची असल्यास त्यांना कसलीही मनाई नाही'', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Comments
Add Comment

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश

बाणगंगा दीपोत्सवासाठी ४० लाखांचा खर्च! महापालिकेकडून २ कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबई : बाणगंगा तलाव परिसरात त्रिपुरा पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कार्तिक महिन्यात

घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार, 'या' केंद्राची केली स्थापना

मुंबई (खास प्रतिनिधी) : वैवाहिक जीवनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण कमी