जगातला सर्वात महागडा कुत्रा खरेदी करणाऱ्यावर ईडीची धाड

बंगळुरू : कर्नाटकमधील बंगळुरू येथे राहणाऱ्या एस. सतीश यांनी काही दिवसांपूर्वी ५० कोटी रुपये मोजून वुल्फ डॉग अर्थात लांडग्यासारखा दिसणारा कुत्रा खरेदी केला. हा जगातला सर्वात महागडा कुत्रा असल्याचा एस. सतीश यांचा दावा आहे.





फक्त कुत्रा खरेदी करण्यासाठी ५० कोटी रुपयांची व्यवस्था करणाऱ्या एस. सतीश यांच्या उत्पन्नाचे स्रोत काय असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. नेटकऱ्यांप्रमाणेच ईडी अधिकाऱ्यांनाही हा प्रश्न सतावत आहे. ईडीच्या पथकाने एस. सतीश यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. सतीशने ईडीला स्वतःहून ज्या बँक खात्याची माहिती दिली त्या खात्यातून ५० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे दिसत नाही. यामुळे कुत्र्याच्या खरेदीसाठी हवालामार्फत आर्थिक व्यवहार झाला आहे का ? याची चौकशी ईडीने सुरू केली आहे.

एस. सतीश या ५१ वर्षीय व्यक्तीने फेब्रुवारी २०२५ मध्ये एका दलालामार्फत वुल्फ डॉग अर्थात लांडग्यासारखा दिसणारा कुत्रा खरेदी केला. जगातील सर्वात दुर्मिळ म्हणून ओळखला जाणारा कॅडाबॉम्ब ओकामी प्रजातीचा हा कुत्रा फक्त आठ महिन्यांचा आहे. त्याचे वजन ७५ किलो आहे आणि उंची ३० इंच आहे. हा कुत्रा खरेदी करण्यासाठी ५० कोटी रुपये मोजल्याचे एस. सतीश यांनी सांगितले.
Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे