अमरावती : विदर्भातील अमरावती येथे विमानतळाचे लोकार्पण केल्यानंतर विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी, भाषण करताना फडणवीसांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना भावनिक साद घातली. शेतकऱ्यांनी जमीन विकली नाही पाहिजे, दलालांच्या भानगडीत पडले नाही पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. शेतकरी असो की प्रकल्पग्रस्त असो, आता कायदा असा केला आहे की, कोणतेही सरकार आले तरी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल. कोणीतरी येतो आणि शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतो आणि पाचपट दराने तो विकतो. त्यामुळे, शेतकऱ्यांनी जमीन विकू नये, पूर्ण माहिती घ्या कोणालाही बळी पडू नका, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथील कार्यक्रमातून शेतकऱ्यांना केलं आहे.
आम्ही जमिन अधिग्रहणाची घोषणा केली की कोणीतरी धन्नाशेठ येतो आणि शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेतो. त्यानंतर ५ पटीने तेथे पैसे कमावतो. त्यामुळे, ज्याठिकाणी जमीन अधिग्रहण होतोय, त्याठिकाणी तुम्ही जमिनी विकू नका, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोणीतरी अचानक तुमची जमीन विकत घेतोय तर माहिती घ्या. हा जमीन का घेतोय. कारण, शेतकऱ्यांना पैसे मिळावे, व्यापाऱ्यांना नको, अशी आमची भावना आहे, असे म्हणत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देवेंद फडणवीसांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना येत्या काळात सगळ्यांना पैसे मिळतील, कोणीही आले तर तुम्ही थेट कार्यालयात जा, पण दलालांच्या भानगडीत पडू नका, असा सल्ला देखील फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिला. तसेच, समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांसाठी लाईफलाईन बनल्याचेही त्यांनी सांगितले.
२०२२ ला महायुतीचे सरकार आल्यावर मी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि या प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. आमदार प्रताप अडसड मला नेहमी भेटायचे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा म्हणत, मागणी करायचे. कायद्याने आम्हाला मार्ग काढायचा होता. मग आम्ही अधिकाऱ्यांना घेऊन बसलो आणि म्हटले की आपण सानुग्रह अनुदान दिले तर काय होईल. त्यामुळे अखेर निर्णय घेतला आणि जर यात काही अडचण आली तर मी त्याला उत्तर देईल, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आपण न्याय मिळवून दिल्याचे म्हटले.
अमरावतीकरांना गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेलं अमरावती विमानतळ बुधवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले आहे. राज्य सरकारच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अखत्यारितील अमरावती विमानतळाचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. अलायन्स एअर कंपनीची मुंबई – अमरावती – मुंबई ही विमानसेवा सुरू झाली. या विमानतळावरून पहिल्या विमानाने सकाळी ११.३० वाजता उड्डाण केले. अलायन्स एअर कंपनीने अमरावतीवरुन मुंबई अशी विमान सेवा सुरू केली आहे. अमरावती ते मुंबई अशा विमान प्रवासाचे प्रति व्यक्ती २१०० रुपयांचे तिकीट काढावे लागणार आहे. मुंबई-अमरावती तिकीट देखील याच किंमतीत उपलब्ध आहे. अमरावतीत पायलट ट्रेनिंग स्कूल (वैमानिक प्रशिक्षण केंद्र) सुरू होणार आहे. यूएस दक्षिण आशियामधील सर्वात मोठ पायलट ट्रेनिंग स्कूल असणार आहे. दरवर्षी येथे १८० पायलट तयार होतील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. येथे ३४ विमाने पार्क (उभी) असतील. अलायन्सपाठोपाठ स्टार व इंडिगोची विमाने सुरू होणार आहेत.
उद्घाटनादरम्यान सुरक्षा व्यवस्थेचा फटका राज्यमंत्री दर्जा असलेल्या निलेश हेलोंडे पाटील यांना बसला. त्यांना सुरक्षारक्षकांनी आत जाण्यास मनाई केली. त्यामुळे विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेबाबतचा असमन्वय समोर आला आहे. यादरम्यान अमरावती विमानतळावरच शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची पोलिसांसोबत बाजाबाची झाली. शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष गोपाल अरबट यांना विमानतळाच्या आत जाण्यासाठी परवानगी न दिल्यामुळे समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते.
अमरावती शहराचे माझ्यावर कर्ज आहे. कारण माझी आई अमरावतीची आहे. त्यामुळे अमरावतीशी माझे एक वेगळे नाते आहे. अमरावतीत काहीही चांगले झाले की सर्वाधिक आनंद माझ्या आईला होत असतो. तिला आनंद देणे हे माझ्या आनंदासाठी महत्त्वाचे कारण असते. या विमानतळाचे काम पूर्ण केले. २०१९ मध्ये आपण विमानतळाचे काम सुरु केले होते. सुरुवातीला धावपट्टीचा विस्तार केला. त्यानंतर काही कारणाने ते काम बंद पडले होते. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पुन्हा सरकार आल्यानंतर वेगाने ते काम पूर्ण केले. आज मला आनंद आहे फक्त विमानतळ तयार नाही तर उडान या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारने पहिले विमान या ठिकाणी दिले. त्या विमानात बसून आम्हाला येता आले. त्यामुळे मी मोदींचे आणि केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
एमएमआरडीए महानगर आयुक्त यांची कोरियन उच्चस्तरीय शिष्टमंडळाने घेतली भेट मुंबई : मुंबई हे जागतिक मानकांनुसार…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…