
मुंबई : मुंबई मेट्रोची (Mumbai Metro) एक्वा लाइन म्हणजे यलो लाईन २बी मार्गासंदर्भात आजचा दिवस म्हणजेच १६ एप्रिल महत्त्वाचा दिवस असणार आहे. मेट्रो लाईन २बी (Metro Line 2B) मार्गावर आजपासून चाचणी होणार आहे. भारतीय रेल्वेच्या १७२व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ट्रायल रन सुरू करण्यात येत आहे. या चाचणीनंतर डायमंड गार्डन (चेंबूर) ते मंडाले (मानखुर्द) या ५.४ किलोमीटर लांबीच्या मार्गावर लवकरच मेट्रो धावणार आहे. तसेच चेंबूर येथे मोनोरेलसोबत मेट्रो जोडली जाणार आहे. या चाचणीनंतर सुरक्षा प्रमाणपत्र जारी केल्यावर हा मार्ग सुरू होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तीन सामंजस्य करार मुंबई : राज्यातील २० आयटीआयमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा (State of the art laboratory) उभारणे, सूक्ष्म ...
मेट्रोच्या मार्गावर पाच स्थानकांचा समावेश असून या स्थानकांदरम्यान ताशी ८० किमीच्या वेगाने या गाडीची चाचणी घेतली जाणार आहे. चाचणीमध्ये रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग आणि ट्रॅकसह एकात्मता चाचणी होणार आहे. त्यानंतर लोडेड ट्रायल घेतली जाणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर मुंबईतील मेट्रोचा नवीन मार्ग सुरू होण्याचा मार्ग मोकळा आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अंतिम मंजुरीनंतर प्रवाशांसाठी सेवा सुरू होणार आहे. तसेच चेंबूर येथे मोनोरेलशी जोडली जाणार असून प्रवाशांसाठी मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्टचा फायदा होणार आहे. तसेच मुंबईकरांना या भागातून उन्हाळ्यात मेट्रोतून गारेगार प्रवास करता येणार आहे.
मुंबईतील ही पहिली भुयारी मेट्रो (Mumbai Metro) असलेल्या कुलाबा वांद्रे सीप्झ हा मेट्रो ३ संपूर्ण मार्ग ३३.५ किमी आहे. या मार्गाची पाहणीसुद्धा मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्या पथकाकडून झाली आहे. यामध्ये २७ भूमिगत स्टेशन आहेत.
दुसरा टप्पा कधी सुरू होणार?
डिसेंबर २०२६ पर्यंत संपूर्ण मार्गिका सुरू होणार असून आता एमएमआरडीएकडून (MMRDA) मंडाळे ते चेंबूरदरम्यान मेट्रोच्या ट्रायल रन सुरू केल्या जाणार आहेत. त्यामध्ये वजनासह गाडीच्या चाचण्या, सिग्नलिंग यंत्रणा तसेच ट्रॅक्शन चाचण्यांचा समावेश असेल. या चाचण्या पूर्ण झाल्यावर आरडीएसओकडून मेट्रो गाड्यांची चाचणी केली जाईल. त्यानंतर कमिशन ऑफ मेट्रो रेल सेफ्टी यांना तपासणीसाठी बोलावले जाईल. ही तपासणी पूर्ण करून डिसेंबरअखेर ही मेट्रो मार्गिका सुरू करण्याचा एमएमआरडीएचा (MMRDA) प्रयत्न आहे. डायमंड गार्डन ते डी. एन. नगर या उर्वरित मार्गावरील मेट्रो मार्गिकेची कामे अद्याप सुरू आहेत. ही कामे पूर्ण करून हा मार्ग डिसेंबर २०२६ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल केला जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात असतील ही स्थानके
- मंडाळे डेपो
- मानखुर्द
- बीएसएनएल मेट्रो
- शिवाजी चौक
- डायमंड गार्डन
मेट्रो 2B चे कारशेड
मेट्रो 2 ब – मंडाले कारशेडचे ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर आता विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले असून ८ एप्रिलपासून कारशेडमधील विद्युत प्रवाहदेखील सुरू होणार आहे. मेट्रो 2B हा मार्ग हा पश्चिम द्रुतगती मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, मोनोरेल, मेट्रो मार्ग -2अ (दहिसर ते डी एन नगर), मेट्रो मार्ग-3 (कुलाबा ते सिप्झ) आणि मेट्रो मार्ग -4 (वडाळा ते कासारवडवली) या महत्वाच्या मार्गांना जोडणारा आहे.