अमरावती : दर्यापूर रोडवरील नायरा पेट्रोल पंपासमोर दोन कारची समोरा-समोरा धडक झाली. या अपघातात एकाचा मृत्यू तर चार जण जखमी झालेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजता घडली आहे.शहेबाज खान अहमद खान (३०) रा. सोनोरी रा. मूर्तिजापूर असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अब्दुल आबीद अ. राजीक (२७), आदीबा समर नासिर हुसेन (२४), अल्फीया अनम जिया खान (२३), रेहना परवीन अहमद खान (५०) खालीद खान सहेबाज खान (३) सर्व रा. सोनोरी, ता. मूर्तिजापूर अशी जखमींचे नावे आहेत. खान कुटुंबीय सोनोरी येथून दर्यापुरात लग्न सोहळ्यासाठी आले होते.
दरम्यान पनोरा नजीकच्या नायरा पेट्रोल पंपासमोर समोरून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. या अपघातात शहेबाज खान अहमद खान यांचा मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयातून तातडीने सर्व जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलवले आहे. घटनेची माहिती शहरात पसरताच नातेवाईक व नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. घटनास्थळी परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी शिवम विसापुरे यांनी भेट देऊन पाहणी केली. धडक देणाऱ्या कारचा चालकही जखमी झाल्याची माहिती आहे.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…
मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…