Chhava Film : चित्रपटात काम करणारा कलाकारच म्हणतोय, 'छावा चित्रपट वाईट'

  124

मुंबई : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाने २०२५ मध्ये सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या सिनेमाने सर्व प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं. हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. ज्या सीनसाठी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता तो सीन काढून टाकल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. मात्र आता हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकाराने समाज माध्यमांवर पोस्ट करत छावा चित्रपट वाईट असल्याचं म्हटलं आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, छावा या चित्रपटाने अनेक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मागे टाकले आहे. या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन हिट झाल्यावर हा सिनेमा तामिळ भाषेतही प्रदर्शित करण्यात आला होता. सिनेमाने केवळ भारतात ६०० कोटींहून अधिक गल्ला जमावला आहे. या चित्रपटाने काहींच्या मनावर राज्य केले तर काही अंशी प्रेक्षकांना हा सिनेमा खटकला असल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये मराठी कलाकारांचा देखील समावेश आहे. मराठी कलाकार आस्ताद काळे याने या चित्रपटात 'सूर्या' ही भूमिका साकारली आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर जवळपास २ महिन्यांनी आस्तादने फेसबुक पोस्ट शेअर करत या सिनेमातील खटकलेले मुद्दे उपस्थित केले आहेत.


अभिनेत्याने एकूण ५ पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये आस्तादने “हा कुठला इतिहास आहे? महाराणी सोयराबाई सरकारांनी छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाच्या मुलाला पत्र पाठवलं होतं? काय पुरावे आहेत याचे? मी आता खरं बोलणार आहे…छावा वाईट फिल्म आहे, फिल्म म्हणून वाईट आहे. इतिहास म्हणून बघायला गेलात तरी प्रॉब्लेमॅटिक आहे. सर्वतोपरी वाईट आहे.” अभिनेता पुढे लिहितो, “औरंगजेबाचं वय आणि आजारपण बघता, तो या वेगाने चालू शकेल? सोयराबाई राणी सरकारांचे अंत्यसंस्कार एका नदीकाठी? असं नाही व्हायचं हो! सोयराबाई राणी सरकार या परपुरुषासमोर बसून पान लावतायत? आणि ते खातायत? हे कसं चालतं?” असे मुद्दे या पोस्टद्वारे आस्तादने उपस्थित केले आहेत. दरम्यान आस्तादच्या या पोस्ट नंतर नवा वाद उफाळणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Comments
Add Comment

Dadar Kabutar Khana : "कबुतरखाना वाद तापला! जैन समाजाला मराठी एकीकरण समितीची थेट चेतावणी"

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद करण्यात आलेल्या दादर कबुतरखान्याच्या (Dadar Kabutar Khana) प्रकरणावरून सध्या

पोकोचा एम ७ प्लस 5जी भारतात १३ ऑगस्टला होणार लाँच

मुंबई : पोकोकडून एम 7 प्लस 5जी भारतात लॉन्च होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 13 ऑगस्ट रोजी

शिवसेना महिला शाखाप्रमुखाला उबाठाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून घटनेची दखल, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

मुंबई: वरळीतील शिवसेना शाखा क्र. १९८ च्या महिला शाखाप्रमुख पूजा बरिया यांना काल उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांकडून

मुंबईतील सण उत्सवांसाठी मुंबई पोलीस सज्ज : सणासुदीत कडेकोट बंदोबस्त

मुंबई : मुंबईमध्ये सण, उत्सवांचा हंगाम सुरु झाला आहे . या पार्श्वभूमीवर मुंबईतील पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी आणि

एअर इंडिया एक्सप्रेसची ‘फ्रीडम सेल’ घोषणा

मुंबई : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एअर इंडिया एक्सप्रेसने “फ्रीडम सेल”ची घोषणा करत प्रवाशांना

कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन दोन दिवस बंद

कोल्हापूर : कोल्हापुरच्या देवी अंबाबाईचे दर्शन दोन दिवस बंद राहणार आहे. सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस मूर्तीवर