मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच वाढला असून नागरिकांना उन्हाच्या कडाक्याचा सामना करावा लागत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून वाढत्या उन्हाच्या झळांमुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. मात्र नागरिकांना आता उन्हापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रासह इतर २० राज्यांना वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह देशातील २० राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळेल, अशी शक्यता आहे. महाराष्ट्र आणि झारखंडच्या काही भागांत गारपीटीची शक्यता आहे.
तसेच बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही जिल्ह्यांत हलका पाऊस आणि जोरदार वारे वाहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आसाम, मणिपूर, मेघालयातील काही जिल्ह्यांत पाच दिवस पाऊस कोसळेल, अशी शक्यता आहे.
सध्या मध्य प्रदेशापासून विदर्भासह मराठवाडा, कर्नाटक, तामिळनाडू ते मन्नाताच्या आखातापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. तसेच मध्यप्रदेशसह समुद्रसपाटीपासून नजीकच्या भागांमध्ये साधारण ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहताना दिसत आहेत. यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पूरक वातावरण निर्मिती झाली असून राज्याच्ाय बहुतांश भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटचा इशारा दिला आहे.
एमएमआरडीए महानगर आयुक्त यांची कोरियन उच्चस्तरीय शिष्टमंडळाने घेतली भेट मुंबई : मुंबई हे जागतिक मानकांनुसार…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…