PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सवाल, मुस्लिमांची सहानुभूती असेल तर काँग्रेस मुस्लिमाला पक्षाचा अध्यक्ष का करत नाही?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल


हिसार : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) हरियाणातील हिसारमध्ये काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत धार्मिक तुष्टीकरण, वक्फ कायदा, संविधानाचा अपमान आणि मुस्लिमांच्या नेतृत्वावरील अपुऱ्या प्रतिनिधित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी काँग्रेसवर मुस्लिमांच्या नावाने केवळ लांगूलचालन केल्याचा आरोप करत विचारलं, "जर खरोखर मुस्लिमांविषयी सहानुभूती असेल, तर काँग्रेसने आजपर्यंत कधी मुस्लिम व्यक्तीला पक्षाच्या अध्यक्षपदी का नेमलं नाही?"



मुस्लिमांचा वापर, पण नेतृत्व नाही – मोदींची काँग्रेसवर बोचरी टीका


पंतप्रधान मोदी म्हणाले, "काँग्रेसने नेहमीच मुस्लिमांच्या नावाने केवळ मतांसाठी राजकारण केलं, पण त्यांच्या प्रगतीसाठी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. वक्फ कायद्यात सुधारणा करून निवडणूक गमावू नये यासाठी संविधानाच्या तत्वांवरच घाला घातला. काँग्रेसने कट्टरपंथीयांना खूश ठेवण्यासाठी बहुसंख्य मुस्लिम समाजाचं नुकसान केलं."



वक्फ कायद्यावरून काँग्रेसवर टीका


पंतप्रधान मोदी म्हणाले की, "२०१३ मध्ये काँग्रेसने वक्फ कायद्यात बदल करून संविधानाच्या मूल्यांना दुखावलं. जर योग्य नियोजन केलं असतं, तर आज मुस्लिमांना पंक्चर झालेल्या सायकली दुरुस्त करत बसावं लागलं नसतं."



डॉ. आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप


“आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यांनी सामाजिक न्यायाचं स्वप्न पाहिलं होतं. पण काँग्रेसने त्यांचा अपमान केला, त्यांना निवडणुकीत हरवलं, त्यांच्या विचारांना गाडण्याचा प्रयत्न केला,” असा आरोपही त्यांनी केला.



आरक्षण, UCC, आणि संविधानाचं राजकारण


मोदींनी काँग्रेसवर संविधानाचा वापर सत्तेसाठी हत्यार म्हणून केल्याचा आरोप करत सांगितलं की, "काँग्रेसने धर्माच्या आधारावर आरक्षण दिलं, एससी/एसटी/ओबीसींना न्याय मिळाला की नाही हे तपासण्याचीही कधी गरज वाटली नाही. उलट कर्नाटकमध्ये त्यांच्या सरकारने धार्मिक आरक्षण देऊन संविधानाची भावना पायदळी तुडवली."


त्याचप्रमाणे, "उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू केला असताना काँग्रेसने त्यालाही विरोध केला. संविधान प्रत्येक नागरिकासाठी समान कायद्याची ग्वाही देतो, पण काँग्रेसने तो निवडणुकीसाठी मोडला," असा आरोपही त्यांनी केला.



उड्डाण सेवा आणि विकासाचे वचन


या कार्यक्रमात त्यांनी हिसारमधील हरियाणाच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन करत, “चप्पल घातलेला सामान्य माणूसही आता विमान प्रवास करेल,” असे सांगितले. २०१४ पूर्वी केवळ ७४ विमानतळ होते, आता ती संख्या १५० च्या पुढे गेली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; नेमक प्रकरणं काय

सहारनपूर : उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये एका कुटुंबाचा एकाच रात्रीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस

Video : अहमदाबादमध्ये मनपाचा 'बुलडोझर'! वटवा येथील ४६० अवैध बांधकामे जमीनदोस्त; ५८ हजार चौ.मी. जमीन मुक्त

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील वटवा परिसरात असलेल्या 'वानर-वट' तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी अहमदाबाद

Nitin Nabin : कार्यकर्ता ते राष्ट्रीय अध्यक्ष! बिहारचे नितीन नबीन बनले पक्षाचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष; कोण आहेत नितीन नबीन?

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेत आज एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली. बिहारचे कॅबिनेट मंत्री

इंदूरचा करोडपती भिकारी... तीन घरे, रिक्षा आणि मोटरगाडीचा मालक

सराफा व्यापाऱ्यांना देतो व्याजाने कर्ज इंदूर: इंदूरच्या सराफा बाजारात अनेक वर्षांपासून भीक मागणारा मांगीलाल

न्यूझीलंड सफरचंदावरील आयात शुल्क कमी केल्याने संताप

शेतकरी-बागायतदारांची केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी शिमला : हिमाचल प्रदेशातील शेकडो

बंगळूरुत स्थानिक निवडणुका बॅलेट पेपरवर

राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने २५ मे नंतर होणाऱ्या बंगळूरु येथील स्थानिक