Ryo Tatsuki Prediction 2025 : जुलै महिन्यात येणार जलप्रलय, जपानच्या बाबा वेंगाची भविष्यवाणी

टोकियो : सध्या २०२५ मधील एप्रिल महिना सुरू आहे. हा या वर्षातला चौथा महिना आहे. या वर्षातल्या पहिल्या चार महिन्यात अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. हजारो नागरिकांच्या मृत्यूचे कारण ठरलेला म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेला भूकंप, शेकडोंचे बळी घेणारा आणि अब्जावधींच्या मालमत्तेला खाक करणारा लॉस एंजेलिसच्या जंगलातला वणवा हे याच वर्षात घडले. नैसर्गिक आणि मानवी आपत्तींमध्ये होणारी जीवितहानी आणि वित्तहानी अद्याप थांबलेली नाही. या पार्श्वभूमीवर जपानचा बाबा वेंगा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऱ्यो तात्सुकी नावाच्या भविष्यवतेत्त्याने एक धक्कादायक भाकीत वर्तविले आहे. जुलै २०२५ मध्ये पृथ्वीवर जलप्रलय येईल आणि या प्रलयात जपान आणि आसपासच्या देशांचे प्रचंड नुकसान होईल, असे भाकीत ऱ्यो तात्सुकी या जपानच्या बाबा वेंगाने वर्तविले आहे.



मंगा कलाकार आणि भविष्यवेत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऱ्यो तात्सुकी या जपानच्या भविष्यवेत्त्याने जुलै २०२५ मध्ये येणारा जलप्रलय हा २०११ च्या त्सूनामीपेक्षा महाभयंकर असेल, अशी भीती ऱ्यो तात्सुकी या जपानच्या बाबा वेंगाने व्यक्त केली आहे. हे भाकीत खरे ठरल्यास लाखो नागरिकांचा मृत्यू आणि अब्जावधींच्या मालमत्तेची हानी अटळ आहे. असंख्य गावं आणि शहरं पाण्याखाली जातील, असंही भाकीत ऱ्यो तात्सुकी या जपानच्या बाबा वेंगाने वर्तविले आहे. महाप्रलय आणणाऱ्या त्सूनामीमुळे प्रामुख्याने जपान, फिलिपिन्स, इंडेनोशिया, तैवान या देशांची वाताहात होईल; असे ऱ्यो तात्सुकी या जपानच्या बाबा वेंगाने सांगितले.



बल्गेरियातील गूढवादी आणि वनौषधीशास्त्रज्ञ वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा यालाच बाबा वेंगा म्हणायचे. लहानपणापासूनच अंध असलेल्या या व्यक्तीने केलेली अनेक भाकीते गाजली. बाबा वेंगा हा भविष्यवेत्ता म्हणून प्रसिद्ध झाला. तसाच जपानचा ऱ्यो तात्सुकी हा भविष्यवेत्ता म्हणून प्रसिद्ध आहे. ऱ्यो तात्सुकी याला जपानचा बाबा वेंगा या नावानेही ओळखतात. या ऱ्यो तात्सुकी अर्थात जपानच्या बाबा वेंगाने जुलै २०२५ मध्ये पृथ्वीवर जलप्रलय येईल असे भाकीत वर्तविले आहे. त्याची डायरी 'मी पाहिलेले भविष्य' नावाने १९९९ मध्ये प्रकाशित झाली आहे.

ऱ्यो तात्सुकी अर्थात जपानच्या बाबा वेंगाने १९९१ मध्ये गायक फ्रेडी मर्क्युरीचा मृत्यू आणि १९९५ मध्ये जपानमध्ये झालेल्या भूकंपासह अनेक भाकीते केली होती जी खरी ठरल्याचे सांगितले जाते. यामुळे त्याने वर्तविलेल्या जुलै २०२५ मधील जलप्रलयाच्या भाकिताकडे अनेकजण गांभिर्याने बघत आहेत.

अस्वीकरण : ही इंटरनेटवरुन संकलित केलेली माहिती आहे. या माहितीची पुष्टी प्रहार करत नाही.
Comments
Add Comment

‘मांजरांचे बेट’ अशी ओळख असलेलं अनोखं ठिकाणं

टोकियो : जगात अनेक रहस्यमय आणि अनोखी ठिकाणे आहेत; पण जपानमधील एका बेटाने आपल्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांना

मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दुबई : दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो

ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! युक्रेन विरूद्ध रशिया युद्धासंबंधी चीनसोबत करणार चर्चा

अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच चीनवर शंभर टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

थायलंड  : बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान

मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दुबई  : दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो

‘मांजरांचे बेट’ अशी ओळख असलेलं अनोखं ठिकाणं

टोकियो  : जगात अनेक रहस्यमय आणि अनोखी ठिकाणे आहेत; पण जपानमधील एका बेटाने आपल्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांना