मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेकजण गावी फिरायला जातात. मात्र अनेकांना आरक्षण मिळत नसल्याने काहीजण तत्काळ तिकीट (Tatkal Ticket Booking) बुकींग करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळा बदलणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला असून याबाबत भारतीय रेल्वेने महत्त्वाची माहिती दिली आहे.
भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) तत्काळ तिकीट बुकिंगबाबत निवेदन जारी केले आहे. एसी आणि नॉन-एसी क्लासेस याबरोबरच एजंट यांच्यासाठी तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळा बदणार असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या सर्वा पोस्ट खोट्या असल्याचे समजते. ‘सोशल मीडिया चॅनेल्सवर काही पोस्ट फिरत आहेत ज्यात तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ तिकिटांसाठीच्या वेगवेगळ्या वेळेबद्दल उल्लेख आहे. एसी किंवा नॉन-एसी क्लासेससाठी तत्काळ किंवा प्रीमियम तत्काळ बुकिंगच्या वेळेत सध्या अशा प्रकारचा कोणताही बदल प्रस्तावित नाहीत. एजंटसाठी मंजूर करण्यात आलेल्या बुकिंग वेळेतही कोणताही बदल नाही,” असे आयआरसीटीसीने म्हटले आहे. (Railway Ticket Booking)
रेल्वेचे तात्काळ ई-तिकीट हे एक दिवस आधी बुक करता येते, ज्यामध्ये प्रवास सुरू होण्याची तारीख वगळली जाते. ओपनिंगच्या दिवशी एसी क्लाससाठी (२ए/३ए/सीसी/ईसी/३ई) भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी १० वाजता आणि नॉन-एसी क्लाससाठी (एसएल/एफसी/२एस) भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री ११ वाजता हे तिकीट बुक करता येते. विशेष म्हणजे, फर्स्ट एसी सोडून सर्व क्लासमध्ये तत्काळ बुकिंग करता येते. (Railway Ticket Booking)
तात्काळ तिकीटासाठी प्रवाशांकडून प्रत्येक तिकीटावर सामान्य तिकिटाव्यतिरिक्त काही ठराविक शुल्क आकारले जाते. किमान आणि कमाल शुक्लाच्या आत सेकंड क्लाससाठी मूळ भाड्याच्या १० टक्के आणि इतर सर्व क्लासेससाठी मूळ भाड्याच्या ३० टक्के दराने हे शुल्क निश्चित केलेले आहे. कन्फर्म झालेले तात्काळ तिकीट रद्द केल्यानंतर तुम्हाला कोणताही रिफंड दिला जात नाही. आचानक रद्द केल्यास आणि वेटिंग लिस्टमधील तत्काळ तिकीट रद्द केल्यास सध्याच्या रेल्वे नियमांनुसार शुल्क कापले जाते. (Tatkal Ticket)
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…