RR vs RCB, IPL 2025: राजस्थान रॉयल्सला विजय आवश्यक

मुंबई(ज्ञानेश सावंत) : जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होणार आहे. बेंगळुरूचा संघ तीन सामने जिंकून गुण तक्त्यात पाचव्या स्थानावर आहे तर राजस्थानचा संघ दोन सामने जिंकून सातव्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात राजस्थान व बेंगळुरू दोघांसाठी विजय आवश्यक आहे. परंतु दोघांची कामगिरी पाहता राजस्थानसाठी बेंगळुरू थोडा कठीणच आहे. बेंगळुरूचा आक्रमकपणा त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात नक्कीच मदत करेल.


आता पर्यंत ज्यावेळी त्यांनी सामना जिंकला आहे त्यावेळी पहिली फलंदाजी घेऊन समोरच्या संघावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या उलट परिस्थिती राजस्थान रॉयल्सची आहे ते धावांचा पाठलाग करताना अपयशी ठरत आहेत. गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला शेवटी एका तेज गोलंदाजाची उणीव भासत होती. संदीप शर्मा शेवटच्या षटकात संघाला महाघडा गोलंदाज ठरत आहे.


राजस्थानला गोलंदाजाची रणनीती बदलण्याची गरज आहे. जोफ्रा आर्चर सोबत एका नव्या चेहऱ्याची क्रिकेट रसिक वाट पाहत आहेत. जोफ्रा आर्चरचा सुरवातीचा स्पेल बेगलूरूसाठी धोकादायक ठरू शकतो.
चला तर जाणून घेऊ या आयपीएल मधील आजच्या सामन्यात कोणत्या संघाची सरशी होणार

Comments
Add Comment

Women's Cricket : भारतावरुद्धच्या मालिकेत द. आफ्रिकेकडून ३ टी-२० सामन्यांची भर

जोहान्सबर्ग : पुढील वर्षी होणाऱ्या पहिल्यावहिल्या 'आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी' स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी

Asia Cup : 'महिला टी-२०'चा २८ ऑगस्टपासून युएईमध्ये थरार, ५ सप्टेंबरला रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला; आशिया चषक २०२६ चे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : आशियाई क्रिकेट परिषदेने 'महिला टी-२० आशिया चषक २०२६' या स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक गुरुवारी जाहीर

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची नवी इनिंग! निवृत्तीनंतर कोचिंग नाही, कॉमेंट्री नाही; आता करणार 'हे' मोठं काम

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा लाडका आणि अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत

PCB Cricketer : पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! खेळाडूला बसला मोठा फटका; २ वर्षांची बंदी अन् १० लाखांचा दंड

लाहोर: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शिस्तभंगाच्या आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका खेळाडूवर कठोर

India vs Sri Lanka: आजपासून तीन दिवसीय सराव सामना; टेस्ट मालिकेपूर्वी टीम इंडियाची रंगीत तालीम

श्रीलंकेत रंगणार भारत-श्रीलंका XI चा महासंग्राम! कधी आणि कुठे पाहाता येणार सामना? वाचा डिटेल्स India vs Sri Lanka :

Lightning Strike : धक्कादायक! थायलंडमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान वीज कोसळली; 24 वर्षीय खेळाडूचा मृत्यू, 12 जण जखमी

 Lightning Strike : थायलंडमध्ये सुरू असलेल्या स्थानिक फुटबॉल सामन्यादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत 24 वर्षीय खेळाडूचा वीज