Women's Cricket : भारतावरुद्धच्या मालिकेत द. आफ्रिकेकडून ३ टी-२० सामन्यांची भर

जोहान्सबर्ग : पुढील वर्षी होणाऱ्या पहिल्यावहिल्या 'आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी' स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने वर्षाच्या शेवटी होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेत ३ टी-२० सामन्यांचा समावेश केला आहे. या नव्या बदलांमुळे आता भारतीय महिला संघ यंदाच्या डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यात एकूण ७ सामने खेळणार आहे. यामध्ये १ एकमेव कसोटी सामना, ३ एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० सामन्यांचा समावेश असेल. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी फोलेत्सी मोसेकी यांनी नव्या वेळापत्रकाचे स्वागत केले. "भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध तिन्ही प्रकारांत खेळल्यामुळे आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आमच्या 'प्रोटियाज' संघाची सर्वोत्तम तयारी होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.



एकमेव कसोटी सामना : ९ ते १२ डिसेंबर: सेंट जॉर्ज पार्क, गकेबेर्हा




एकदिवसीय मालिका :
१ ला एकदिवसीय सामना: १६ डिसेंबर (बोलँड पार्क, पार्ल)
२ रा एकदिवसीय सामना: १९ डिसेंबर (न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंड, केपटाऊन)
३ रा एकदिवसीय सामना: २२ डिसेंबर (मंगाउंग ओव्हल, ब्लोमफॉन्टेन)



टी-२० मालिका :
१ ला टी-२० सामना: २६ डिसेंबर (विलोमूर पार्क, बेनोनी)
२ रा टी-२० सामना: २९ डिसेंबर (एनडब्ल्यूसी ओव्हल, पोचेफस्ट्रूम)
३ रा टी-२० सामना: ३० डिसेंबर (एनडब्ल्यूसी ओव्हल, पोचेफस्ट्रूम)

Comments
Add Comment

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग

India U19 Squad : ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारताचा १९ वर्षांखालील संघ जाहीर; सेहवाग-द्रविडच्या मुलांना संधी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय १९ वर्षांखालील संघाची घोषणा

Dean Elgar Retirement : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने घेतली व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी कसोटी सलामीवीर डीन एल्गरने (Dean Elgar Retirement) व्यावसायिक

IND vs SL 2nd Test Day 5 : भारताला हव्यात ४ विकेट्स, पण पावसामुळे विजय हुकणार? कोलंबोत हवामानाचा मोठा धोका

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना निर्णायक

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या