Tanker Price Hike : वाढत्या उन्हात दरवाढीचा चटका! टँकरच्या शुल्कात ५ टक्के वाढ

पुणे : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यभरात उन्हाच्या झळा (Summer Heat) वाढत चालल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात अनेक शहरांसह गावांमध्ये पाण्याची कमतरता (Water Shortage) भासत आहे. त्यामुळे पाण्याच्या टँकरची मागणी (Water Tanker) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र टँकरची मागणी वाढत असतानाच महापालिकेने टँकरच्या दरामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांना वाढत्या उन्हात दरवाढीचा चटका बसत असल्याचे दिसत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेने टँकरच्या दरामध्ये गतवर्षीपेक्षा पाच टक्के वाढ जाहीर केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी तब्बल ८७ हजार ८८८ टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. मार्च महिन्याचा विचार करता गतवर्षी ३८ हजार २९९ टँकरच्या फेऱ्या झाल्या होत्या. त्यात ९ हजार ५९७ टँकरची भर पडून एका महिन्यात ४७ हजार ८९६ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पुणे महापालिकेकडून खडकवासला धरणासह भामा आसखेड धरणातून पाणी उचलले जाते. ज्या परिसरात कमी पाणीपुरवठा होतो, त्या ठिकाणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.


यासाठी महापालिकेने पर्वती, वडगावशेरी, धायरी, रामटेकडी, चतु:श्रृंगी, पद्मावती, पटवर्धन बाग अशा विविध सात ठिकाणी टँकर पॉइंटची व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या मालकीचे व ठेकेदारांचे टँकर यासाठी कार्यरत आहेत.



काय आहेत टँकरचे दर?



  • दहा हजार लिटरपर्यंत : जुना दर ६६६ रुपये - नवीन दर ६९९ रुपये

  • दहा हजार ते पंधरा हजार लिटरपर्यंत : जुना दर १०४८ रुपये - नवीन दर ११०१ रुपये

  • पंधरा हजार लिटरपेक्षा जास्त : जुना दर १४७८ रुपये - नवीन दर १५५२ रुपये

  • महापालिकेचा टँकर असल्यास (नागरिकांसाठी) दहा हजार लिटरपर्यंत : जुना दर ११८२ रुपये - नवीन दर १२४१ रुपये

Comments
Add Comment

Kondhwa Search Operation : एटीएसचा कोंढव्यात शिरकाव! गल्लीबोळामध्ये झळकले आय लव मोहम्मदचे बॅनर, पोलीस तपास सुरू

पुणे : पुण्यातील कोंढवा (Kondhwa) परिसर आज पहाटेपासूनच तपास यंत्रणांच्या छापामारीमुळे चर्चेत आला आहे. तपास यंत्रणांची

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा