Summer Fashion Dresses : हाये गरमी! उन्हाळ्यात असे कूल कॉटन ड्रेसेस नक्की ट्राय करा!

  56

उन्हाळ्यात वातावरणात बदल होतो. ज्यामुळे तापमान वाढते. यामुळे आपल्याला अधिक गरम होते. शरीरातून घामाच्या धारा वाहू लागतात. यामुळे आपल्या जाड आणि उबदार कपडे नकोसे वाटतात. अशावेळी आपल्याला हलके-फुलके कॉटनचे कपडे घालण्याची इच्छा होते. जसा की बदलत्या ऋतूनुसार आपण आपल्या आहारात बदल करत असतो. तसेच बदलत्या ऋतूप्रमाणे आपल्या कपाटातील कपड्याची स्टाईल देखील बदलत असते. उन्हाळ्यात तुम्ही असे कपडे परिधान करण्याचा विचार करतात ज्यामध्ये तुम्‍ही सुंदर आणि स्टायलिश दिसाल तसेच तुम्हाला त्यात आरामदायी देखील वाटेल. अशा परिस्थितीत उन्हाळ्याच्या हंगामात योग्य फॅब्रिक निवडणे खूप महत्वाचे आहे. अशातच अनेक लोकं या ऋतूत सुती कापड खूप आरामदायक असल्याने यांची निवड करतात. जीन्स म्हणा किंवा ट्राऊजर्स हे सर्व ठीक आहे, मात्र उन्हाळ्याच्या हंगामात मुलींना सुटसुटीतच कपडे परिधान करावेसे वाटतात. उन्हाळ्यात सर्वच मुली जीन्स आणि घट्ट कपडे परिधान करण्यापेक्षा आरामदायी कपड्यानां प्राधान्य देतात. तुम्ही सुद्धा उन्हाळ्यात कपड्यांची खरेदी सुरू करणार असाल, तर खास उन्हाळ्यात परिधान करण्यासाठी काही नवनवीन डिझाइन्सचे गाऊन किंवा वनपीस तुम्ही ऑफिस किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी परिधान करू शकता. चला तर मग जाणून घेऊया...



प्रिंटेड गाउन



अतिशय सुंदर, सुटसुटीत आणि आरामदायी असा हा स्लिव्हलेस कॉटनमध्ये गाऊन आहे ज्यात तुम्हाला गोलाकाराची प्रिंट मिळेल. असा गाऊन तुम्ही ऑफिससाठी नक्की वेअर करू शकता.



नी-लेन्थ वनपिस



नी-लेन्थ वनपिस ऑफिसला घालून जाण्यासाठी सोबर लुक देतात. तसेच खालून मोकळे असल्याने मांड्या काचत नाहीत. न्यूड मेकअपसह अतिशय सुंदर लूक देतो. हा एक ऑप्शन तूम्ही ट्रे करू शकता.



कॉलर नेक मॅक्सी ड्रेस



तुम्ही अनेकदा डीप नेक किंवा राऊंड नेक असलेला मॅक्सी ड्रेस बघितला असेल. पण बाजारात आजकाल कॉलर नेक डिझाईन असलेला मॅक्सी ड्रेसही पाहायला मिळतात. हा ड्रेस खूप क्लासी वाटतो. असा कॉलर नेक मॅक्सी ड्रेस घालून तुम्ही ऑफिसमध्ये किंवा डिनर डेटवर जाऊ शकता. या मॅक्सी ड्रेससोबत हाय हिल्स आणि हेवी इअररिंग्स घाला. त्यामुळे तुमचा लूक सिंपल आणि एलिगंट वाटेल.



ऑफ शोल्डर मॅक्सी ड्रेस



उन्हाळ्यासाठी सैल ऑफ शोल्डर मॅक्सी ड्रेसचा ऑप्शन तुम्ही ट्राय करु शकता. डिनर पार्टीसाठी हा चांगला पर्याय आहे. या ड्रेससोबत ज्वेलरी कमी असल्यास लूक छान वाटतो. नुसते हेवी इअररिंग्स घातले तरी चालतात.



मिडी गाऊन




सध्या बाजारात आपल्याला सिंपल आणि सोबर दिसणारे मिडी ड्रेस पाहायला मिळतात. काही ड्रेसेस वर प्रिंट सुद्धा येते. या ड्रेसेसमध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स, रंगीबेरंगी प्रिंटेड कलर्स मार्केटमध्ये उपलब्ध असतात. गुडघ्याच्या खाली असणारा हा गाऊन अतिशय सुंदर आणि कम्फर्ट वाटतो.

फ्लोरल प्रिंट मॅक्सी ड्रेस



फ्लोरल प्रिंट मॅक्सी ड्रेस हा उन्हाळ्यात कूल वाइब्स देणारा स्टायलिश ड्रेस आहे. ऑफिस डे, पार्टी किंवा आउटींगसाठी तुम्ही हा ड्रेस घालू शकता. यात तुम्हाला अनेक प्रिंट बघायला मिळतात. तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन हा ड्रेस खरेदी करु शकता.


Comments
Add Comment

भंडाऱ्यातलं जेवणं पडलं महागात, संपूर्ण गावाला विषबाधा!

नंदुरबार: नंदुरबार तालुक्यातील भिलाईपाडा या गावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. सध्या सणा सुदीचा काळ असून

दुबईतील साईभक्ताकडून तब्बल १ कोटी ५८ लाखांचे सुवर्ण दान; सोन्यात घडवली ॐ साई राम अक्षरे

अहिल्यानगर : शिर्डी साई बाबांना हैदराबादमधील आदीनारायण रेड्डी यांनी २००८ साली सुवर्ण सिंहासन दान स्वरूपात दिले

Ganeshotsav 2025: सुरक्षेसाठी लालबाग - परळ येथील प्रतिष्ठित गणेश मंडळांमध्ये फेस डिटेक्टर

मुंबई: अनंत चतुर्दशीला अवघे काही दिवस बाकी आहेत, शनिवार ६ सप्टेंबरला बाप्पा आपल्या गावी जाणार आहेत. त्यामुळे

टायगर मेमनच्या नातेवाईकांचा फ्लॅटवरील हक्क कोर्टाने फेटाळला

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी टायगर मेमनच्या नातेवाईकांनी दाखल केलेली याचिका

मुंबईत ईद-ए-मिलादच्या सुट्टीत बदल

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मुस्लिमांना ईद-ए-मिलाद सणाची सुटी शुक्रवार पाच सप्टेंबर २०२५ ऐवजी सोमवार आठ

नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकुळ

त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यात पंधरा दिवसात विविध ठिकाणी तीन बिबट्यांना पकडण्यात वन विभागाला यश आले. जिल्ह्यात