बंगळुरू / दावणगेरे : वक्फ (दुरुस्ती) कायद्यावरून (Waqf Amendment Bill 2025) देशभरात सुरू असलेल्या वादात आता आणखी एक खळबळजनक वळण आले आहे. कर्नाटकातील काँग्रेसचे माजी नगरसेवक कबीर खान यांनी आंदोलनकर्त्यांना “प्रत्येक शहरातून ८-१० लोक मरायला हवेत. ५०-१०० गुन्हे दाखल व्हायला हवेत. बस-ट्रेन जाळा” अशा स्वरूपाचे आक्षेपार्ह आणि भडकावू वक्तव्य केल्याचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या दोन मिनिटांच्या व्हिडिओत कबीर खान यांनी वक्फ कायद्याच्या विरोधातील निषेध अधिक उग्र करण्याचे आवाहन करताना, पोस्टर धरून आणि निवेदन देऊन काही होणार नाही, असे म्हणत आंदोलनकर्त्यांना हिंसक मार्ग अवलंबण्याचा सल्ला दिला आहे. कबीर खान तरुणांना रस्त्यावर येण्याचे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे आणि कायद्याच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी प्राणांचे बलिदान देण्याचे आवाहन करताना दिसत आहे. बस, ट्रेन जाळा. या गोष्टी फक्त बोलून होत नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणात त्याग, बलिदान द्यावे लागेल, असे कबीर खान यांनी म्हटले आहे.
“रस्त्यावर उतरा, प्राणांचे बलिदान द्या, जाळा, मरा, प्रत्येक गावातून ८-१० लोक मरायला हवेत… एवढ्या सोप्या पद्धतीने हे बिल मागे घेतलं जाणार नाही,”
— कबीर खान, काँग्रेसचे माजी नगरसेवक
या वक्तव्यानंतर दावणगेरे पोलीस विभागाने तत्काळ कारवाई करत भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर तुफान चर्चेत असलेला हा व्हिडिओ ८ एप्रिल रोजी अज्ञात ठिकाणी रेकॉर्ड करण्यात आला होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर कबीर खान फरार असून, त्याचा मोबाईल बंद आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
या वक्तव्यावर सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, राजकीय वर्तुळात काँग्रेसवरही टीकेची झोड उठली आहे. एका बाजूला काँग्रेस वक्फ कायद्यातील बदलांवर मौन बाळगत असल्याचा आरोप होत असतानाच, दुसऱ्या बाजूला तिच्या माजी पदाधिकाऱ्याचे असे विधान समोर येणे पक्षाच्या अडचणी वाढवणारे ठरत आहे.
अलीकडेच पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्या विरोधात हिंसक आंदोलन उसळले होते. आता कर्नाटकमध्ये अशा प्रकारचे भडक वक्तव्य समोर येणे देशभरातील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिंताजनक मानले जात आहे.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…
मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…