कणकवली : वैभववाडी कोल्हापूर हा रेल्वे मार्ग लवकरच सुरू करणार आहोत. आंबा, काजू, कोकम पासून लोणचे,पापडापर्यंत चे सर्व प्रक्रिया उद्योग येथे आणणार आहोत.तसे प्रयत्न आमचे आहेत. जनतेने साथ द्यावी. शेती करा, उपन्न वाढवा त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य केले जाईल. शेवगा, फणस यांचे आयुर्वेदात फार महत्व आहे. त्यावर प्रक्रिया करा. फणसाच्या बियाची पावडर करून डायबिटीस वर औषध बनवले जाते. शेवगा आयुर्वेदिक औषध आहे. गवती चहावर संसार चालतात, कोकणातील प्रत्येक उत्पादनाला महत्व आहे. इथल्याच उत्पादनांवर येथेच प्रक्रिया करा. इथेच मार्केटिंग तुम्ही करून उत्पादने राज्यात देशात आणि परदेशात पाठवा.तेव्हाच येथील प्रत्येक कुटुंबाचे, प्रत्येक व्यक्तीचे दरडोई उत्पन्न वाढेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदगाव वाघेरी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या मार्केट यार्डच्या भूमिपूजन प्रसंगी माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री नितेश राणे, पणन मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुलशीदास रावराणे, जिल्हाधिकारी दिलीप पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाशी सोडली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार ही एकमेव एपीएमसी राहणार आहे. एपीएमसीचे प्लॅन उत्कृष्ट आहे. अतिशय महत्वाचा पॉईंटवर ही जागा आहे. असे असले तरी आपले काम आता अजून वाढणार आहे. एपीएमसी चालवायची कशी, हे आता आपल्या हातात आहे. एपीएमसी उभी करत असताना इकडे एकही एसी रूम करू नका. आराम करता येईल अशी रूम करू नका. केबिन सगळे उघडे दिसले पाहिजे. कारण हे एपीएमसी आपण शेतकऱ्यांसाठी करत आहोत. जे वाशीला घडले, ते आपल्या जिल्ह्यात घडू नये. एपीएमसी उभी करताना दर्जेदार वास्तू उभी राहिली पाहिजे. शेतकऱ्यांना त्रास देतील असे नेते इकडे तयार व्हायला नको, असे आमदार निलेश राणे यांनी यावेळी सांगितले.
सिंधुदुर्गमध्ये मार्केट यार्ड व्हावे हे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांचे स्वप्न होते. त्यांच्या इच्छाशक्तीतून प्रेरणा घेऊन आज या मार्केट यार्डचे भूमिपूजन होत आहे. ही वास्तु आपल्या जिल्ह्यातील शेतकरी, काजू, आंबा बागायतदार यांच्यासहित मच्छीमारांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत आपण या जिल्ह्यात मार्केट यार्डचे भूमिपूजन करतो, याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे. हे मार्केट यार्ड जिल्हा विकासाचे महत्त्वाचे स्थान बनेल. परप्रांतातील आंबा सिंधुदुर्गात आणून देवगड हापूस म्हणून जर विक्री होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्यावर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…
मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…
ठाणे खाडी पूल ३ प्रकल्पातील दक्षिणेकडील बाजूचे काम पूर्ण मुंबई : ठाणे खाडी पूल ३…