अमेरिकेच्या १४५ टक्के टॅरिफला चीनचे १२५ टक्के टॅरिफने प्रत्युत्तर बीजिंग : अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारयुद्धाचा भडका उडाला आहे. टॅरिफ अर्थात ...
भाजपा - अण्णाद्रमुक युती तामिळनाडूत विधानसभेची निवडणूक लढवेल. ही निवडणूक अण्णाद्रमुकचे अध्यक्ष ई. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वात लढवली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांनी जाहीर केले.
काँग्रेस नेत्याविरोधात गुन्हा दाखल, भडकावणाऱ्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल बंगळुरू / दावणगेरे : वक्फ (दुरुस्ती) कायद्यावरून (Waqf Amendment Bill 2025) देशभरात सुरू ...
जागावाटप योग्य वेळी जाहीर होईल. निवडणूक जिंकल्यानंतर योग्य वेळी मंत्र्यांबाबतची घोषणा केली जाईल. दोन्ही पक्ष एकमेकांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणार नाही; असे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांनी सांगितले.
नयनार नागेंद्रन यांची तामिळनाडू भाजपाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुकीत नयनार नागेंद्रन यांच्या विरोधात कोणीही उभे राहिले नाही, असे सांगत अमित शाह यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. तामिळनाडू भाजपाचे माजी अध्यक्ष के. अण्णामलाई, केंद्रीय मंत्री एल. मुरुगन, माजी केंद्रीय मंत्री पी. राधाकृष्णन, भाजपा आमदार आणि महिला मोर्चा अध्यक्ष वनाथी श्रीनिवासन यांनी नयनार नागेंद्रन यांच्या नावाचा प्रस्ताव तामिळनाडू भाजपाच्या अध्यक्षपदासाठी ठेवला होता. लवकरच के. अण्णामलाई यांच्याकडे पक्षाकडून नवी मोठी जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे वृत्त आहे.