मुंबई : प्रतिष्ठित अमेरिकन आईस्क्रीम ब्रँड आणि भारतासह जगातील सर्वात मोठी QSR आईस्क्रीम व्यवसाय शृंखला बास्किन रॉबिन्सने या उन्हाळ्यासाठी आपली नवीन इटालियन जिलेटो रेंज सादर करत असल्याची घोषणा केली आहे. या सादरीकरणाद्वारे ब्रँड भारतात एक प्रीमियम डेझर्ट डेस्टिनेशन म्हणून स्वतःची ओळख प्रस्थापित करण्याच्या प्रवासाला पुढे नेत असून, पारंपरिक आइसक्रीमच्या पलीकडे जाऊन डेझर्टसच्या क्षेत्रात नवकल्पना आणि वैविध्य आणण्याचा प्रयत्न करत आहे. आर्थिक वर्ष २५ मध्ये बास्किन रॉबिन्सने लक्षणीय वाढ नोंदवली असून येत्या वर्षातही अशाच यशाची पुनरावृत्ती करण्याचा मानस आहे.
या उन्हाळ्यात बास्किन रॉबिन्स इंडिया ने इटालियन जिलेटोची संपूर्ण नवीन श्रेणी सादर केली आहे. त्यामध्ये आकर्षक नवीन स्कूप फ्लेवर्स आणि धमाल संडेजचा समावेश आहे. यासोबतच किड्स संडेजच्या रेंजमध्येही वाढ करून प्रिन्सेस आणि नाईट संडेज नावाने नवीन पर्याय सादर करण्यात आले आहेत. नवीन इटालियन जिलेटो रेंज मध्ये अधिक मऊ, क्रीमी टेक्श्चर आणि जोरदार, समृद्ध फ्लेवर्स आहेत. ते प्रीमियम घटकांसह तयार केले गेले असून, एक अस्सल इटालियन अनुभव देण्यासाठी डिझाइन केले आहेत. सादर केलेल्या इटालियन जिलेटो फ्लेवर्समध्ये चॉकलेट अँड रोस्टेड हेजलनट, मॅंगो अँड क्रीम, आणि ब्लूबेरी चीजकेक जिलेटो यांचा समावेश आहे.
या रेंजसह सादर करण्यात आलेली इटालियन जिलेटो संडेज ही देखील खूप खास आहेत – त्यामध्ये स्वादिष्ट टॉपिंग्ज व लेयर्सचा समावेश असून ते कोणालाही एक सुरेख व अस्सल इटालियन अनुभव देतात. या डिश जणू काही तुम्हाला थेट इटलीमध्येच घेऊन जातात. इटालियन जिलेटो संडेज फ्लेवर्स मध्ये बेरी मी इन चीजकेक, कॉटन कँडी वंडरलँड, आणि सॉल्टेड कॅरमल अँड ब्राउनी यांचा समावेश आहे.
ग्रॅव्हिस ग्रुप (बास्किन रॉबिन्स) चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मोहित खत्तर म्हणाले, “सातत्यपूर्ण बाजारपेठीय विश्लेषण आणि थेट ग्राहक प्रतिसादाच्या आधारे आम्ही ग्राहकांच्या बदलत्या आवडी, पसंती याबद्दल सखोल माहिती मिळविली आहे. या माहितीमुळेच आम्हाला हे वैशिष्ट्यपूर्ण आर्टिसनल जिलेटो फ्लेवर्स आणि संडे रेंज सादर करता आली. त्यामुळे पारंपरिक आइसक्रीमच्या पलीकडे जाऊन ग्राहकांना एक चांगला डेझर्ट अनुभव मिळत आहे. बदलत्या पसंतीक्रम जाणून घेण्याची आणि त्यानुसार त्वरित प्रतिसाद देण्याची आमची क्षमता आम्हाला भारतीय बाजारपेठेत डेझर्ट साठीच्या नवकल्पनांमध्ये आघाडीवर ठेवते आणि आम्ही सर्व वयोगटांसाठी वर्षभर प्रीमियम आणि नाविन्यपूर्ण अनुभव देण्यास कटिबद्ध आहोत.”
मागचे वर्ष बास्किन रॉबिन्ससाठी खूप महत्वपूर्ण ठरले कारण कंपनीने भारत व उपखंडातील आपले १००० वे दालन सुरू केले. आर्थिक वर्ष २४-२५ मध्ये १२० नवीन स्टोअर्स उघडण्यात आली असून नाविन्यपूर्णता आणि प्रीमियम डिझर्ट यावर सतत लक्ष केंद्रित करत कंपनीने आर्थिक वर्ष २६ साठीही जोरदार दोन अंकी वाढीचा अंदाज वर्तवला आहे. हा ब्रँड सध्या भारतातील २९० पेक्षा अधिक शहरांमध्ये आपले स्थान विस्तारत आहे. रिटेल पार्लर्स हे मुख्य महसूल स्त्रोत असले तरी बास्किन रॉबिन्सने आपल्या packaged consumer goods (CPG) विभागात आणि संस्थात्मक / B2B चॅनेलमध्ये सतत वाढ केली आहे. त्यामध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, हॉस्पिटल्स आणि मल्टिप्लेक्स यांसारख्या संस्थांशी भागीदारीचा समावेश आहे. नवीन सादर करण्यात आलेली जिलेटो रेंज आता देशभरातली सर्व बास्किन रॉबिन्स पार्लर्समध्ये ११५ रु. पासून उपलब्ध आहे.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…
मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…