बच्चू कडूंना पहाताच अजित पवारांचा पारा का चढला?

पुरंदर विमानतळ प्रकल्पावरून दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी!


मुंबई : दिव्यांगांच्या मागण्यांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीसाठी माजी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) एकाच वेळी पोहोचले आणि तिथेच दोघांमधे शाब्दिक सामना रंगला. त्यामुळे बैठकीपेक्षा अधिक चर्चा यावरच सुरु आहे.


पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या भूमी अधिग्रहणाविरोधातील आंदोलनात बच्चू कडू यांचा सहभाग पाहून अजित पवारांनी त्यांच्यावर सूचकपणे टीका केली. "तुम्ही त्या आंदोलनात लक्ष घालू नका!" असे दादा म्हणाले आणि बस्स, तिथूनच दोघांमध्ये खडाजंगी सुरु झाली.



अजित पवारांचं सूचक वक्तव्य आणि कडूंचं ठाम उत्तर


अजित पवारांनी बच्चू कडूंना आंदोलनात न पडण्याचा सल्ला दिला. त्यावर कडूंनी स्पष्ट उत्तर दिलं की, “मला शेतकऱ्यांनी बोलावलंय, त्यामुळे मी जाणारच.” यावर अजित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना अधिक मोबदला दिला जाईल. मात्र, कडूंनी जरा वेगळाच मुद्दा मांडला. “शेतकरी जर पूर्णपणे विस्थापित होणार असतील, तर असा प्रकल्पच नको! आणि जर खासगी विमाने उडणार असतील, तर शेतकऱ्यांना मोबदल्याबरोबर भागीदारीही द्या!”



आंदोलनाची पार्श्वभूमी आणि शेतकऱ्यांचा रोष


पुरंदर तालुक्यातील सात गावांतील जमिनी या प्रकल्पासाठी घेण्यात येणार आहेत. यावर गावकऱ्यांनी जोरदार विरोध केला असून याआधी तीन दिवस उपोषणही करण्यात आले. आता शेतकऱ्यांनी बच्चू कडूंना २० एप्रिलला आंदोलनात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे आणि त्यांनीही होकार दिला आहे.


त्यामुळे "ब्रम्हदेव आले तरी हा प्रकल्प करणारच!" अशी जाहीर घोषणा करणाऱ्या अजित पवारांसमोर आता बच्चू कडूंचा सहभाग एक मोठा राजकीय इशारा मानला जातोय.


त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, बच्चू कडू शेतकऱ्यांच्या आंदोलनात ठाम राहणार का? की सरकार त्यांच्या पाठिंब्याची वाट पाहत 'मनधरणी' करणार? शेतकऱ्यांना दिलेला शब्द ते पाळणार की उपमुख्यमंत्र्यांना सकारात्मक प्रतिसाद देणार? या साऱ्या घडामोडींवर सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे!



याआधीही झाली होती 'तू तू मैं मैं'


अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात याआधीही 'तू तू मैं मैं' झाल्याचे पाहायला मिळाले होते. अमरावती विभागाच्या वार्षिक नियोजनाच्या बैठकीदरम्यान हा प्रकार घडला.


अमरावती विभागाच्या वार्षिक नियोजनाची बैठक अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अकोला जिल्ह्याला दिलेल्या निधीवर बच्चू कडू समाधानी नव्हते. परिणामी अजित पवार यांच्या निधी वाटपावर बच्चू कडू यांनी आक्रमक होत नाराजी व्यक्त केली.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या