Friday, May 9, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Aaple Sarkar : 'आपले सरकार' पोर्टल १४ एप्रिलपर्यंत बंद

Aaple Sarkar : 'आपले सरकार' पोर्टल १४ एप्रिलपर्यंत बंद
मुंबई : नागरिकांना पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी सुरू केलेले 'आपले सरकार' पोर्टल १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. आधुनिकीकरणाचे काम करायचे असल्यामुळे पोर्टल १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कोणतेही शासकीय ऑनलाईन काम १४ एप्रिलपर्यंत 'आपले सरकार' पोर्टलद्वारे करता येणार नाही.



शासनाच्या विविध सेवा पारदर्शक पद्धतीने आणि जलदगतीने उपलब्ध व्हाव्यात, कामकाज कार्यक्षम व्हावे, या हेतूने फडणवीस सरकारने 'आपले सरकार' पोर्टल १० वर्षांपूर्वी सुरू केले. या पोर्टलद्वारे जलदगतीने सेवा मिळतात. वेगवेगळी प्रमाणपत्र ऑनलाईन पटकन मिळतात. कार्यालयात जाण्याचा, रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचतो. वेळ आणि पैसा यांची बचत होते. आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, ओळख पुरावा, नरेगा जॉब कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र अशी अनेक कागदपत्रे 'आपले सरकार' पोर्टलद्वारे लवकर मिळवता येतात.



शासनाच्या वेगवेगळ्या विभागांशी संबंधित अनेक सेवा 'आपले सरकार' पोर्टलद्वारे उपलब्ध असल्यामुळे सामान्यांचे काम सोपे होते. यामुळे असंख्य नागरिक 'आपले सरकार' पोर्टलचा वापर करतात. मागील काही वर्षात विश्वासार्ह, वेगवान, सुरक्षित आणि पारदर्शक सेवेमुळे 'आपले सरकार' पोर्टल लोकप्रिय झाले आहे.

सध्या राज्यातील ३८ विभागांच्या ४८५ सेवा 'आपले सरकार' पोर्टलवर आहेत. नागरिकांना या सेवा घरबसल्या मिळवता येत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, २०१५ पासून आपले सरकार डिजिटल प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत एकूण १७ कोटी ६३ लाख ६२ हजार ४६८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील १६ कोटी ६१ लाख ३ हजार ९०९ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण १ कोटी ६६ लाख २३ हजार २७५ अर्ज आले होते.
Comments
Add Comment