Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी प्रकरणातील मास्टरमाइंड झिशान पोलिसांच्या ताब्यात!

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील वांद्रे येथील खेरवाडी सिग्नल येथे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगला आरोपी ठेवण्यात आले असून मुंबई गुन्हे शाखेने एकूण २६ जणांना अटक केली होती. परंतु कट रचणाऱ्या मुख्य सूत्रधारांना जेरबंद करण्यात यश येत नव्हते. मात्र आता या हत्येप्रकरणातील मास्टरमाईंडला पंजाब पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात (Baba Siddique Murder Case) पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांना अटक करुन त्यांची चौकशी केली होती. तेव्हा मुख्य कट रचणाऱ्या शुभम लोणकर, झीशान अख्तर आणि अनमोल बिश्नोई यांची नावे समोर आली. यामधील झीशान अख्तर (Zeeshan Akhtar) फरार झाला असून मंगळवारी पंजाबमधील भाजप नेत्याच्या घरी ब्लास्ट केल्याच्या प्रकरणात झिशान अख्तरसह त्याच्या गँगमधील दोन जणांना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे.



पंजाब भाजपाचे माजी अध्यक्ष्याच्या घरावर ग्रेनेड हल्ला


पंजाब भाजपाचे माजी अध्यक्ष मनोरंजन कालिया यांच्या जालंधर येथील घरावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही, परंतु घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि कार-दुचाकींचे नुकसान झाले. पोलिसांनी या घटनेलसाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीने जबाबदार ठरवले.



कोण आहे झिशान अख्तर?


झीशान हा जालंधरमधील नकोदर येथील शंकर गावचा रहिवासी आहे. टार्गेट किलिंग, खून, दरोडा अशा ९ गुन्ह्यांमध्ये तो वॉन्टेड आहे. ७ जून २०२४ रोजी जीशान तुरुंगातून बाहेर आला. तुरुंगातच त्याची लॉरेन्स गँगचा मुख्य गुंड आणि शूटर विक्रम ब्रारशी भेट झाली. त्याच्या माध्यमातून तो लॉरेन्स गँगशी जोडला गेला. गँगस्टर लॉरेन्सच्या सूचनेनंतर झीशानने बाबा सिद्दिकीची हत्या केली. वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी झिशान गुन्हेगार बनला. पंजाब पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने ही कबुली दिली होती.

Comments
Add Comment

MCCL : डोंबिवलीत क्रिकेटचा महाधमाका!

डोंबिवली - डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर यंदा क्रिकेट आणि ग्लॅमरचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन

यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप, तरुण कलाकारांसाठी सुवर्णसंधी

सुरेश वांदिले भारतीय शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य, रंगमंच, दृष्यकला, लोककला, पारंपरिक आणि देशी कला, सुगम

हॉलतिकीट नाही म्हणून परीक्षा नाही, विद्यार्थी गेले थेट पोलीस ठाण्यात ; धक्कादायक परीक्षा व्यवस्थापन

छत्रपती संभाजीनगर : मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या (एमसीए) विद्यार्थ्यांना हॉलिकीट मिळाले नाही. यामुळे हे

२०१० पासून टियर १ शहरांमध्ये परवडणाऱ्या घरांच्या किमतीत मोठी सुधारणा: कॉलियर्स

मुंबई: दिलेल्या नव्या अहवालातील माहितीनुसार, प्रमुख शहरांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासामुळे, परवडणाऱ्या

वसई-विरारमध्ये ४ माजी नगरसेवक भाजपच्या गळाला

विरार : वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीला भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. बविआचे एकापाठोपाठ एक पदाधिकारी व

'हायटेक केसपेपर नोंदणी' ठरतेय डोकेदुखी !

अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या लांब रांगा अलिबाग  : येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये आयुष्मान