China : चीनमध्ये नर्सिंग होमला भीषण आग, २० जणांचा मृत्यू

चीन : चीनमध्ये एक दुर्दैवी अपघात घडला आहे. चीनमधील हेबेई शहरातील एका नर्सिंग होममध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत २० जणांचा मृत्यू झाला असल्याचं समजत आहे. या आगीचे कारण अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही.



मिळालेल्या माहितीनुसार, चीनमधील हेबेई शहरातील एका नर्सिंग होमला मंगळवारी(दि.८) रात्री ९ च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत बुधवारी(दि.९) सकाळपर्यंत एकूण २० जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. इतर १९ जणांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. यामध्ये वृद्ध, महिला आणि मुले यांचा समावेश आहे. सरकारी माध्यमाने सांगितले की, पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे परंतु याबद्दलची अधिक माहिती दिलेली नाही.पोलिसांकडून या आगीचे कारण तपासले जात आहे.


याच वर्षी जानेवारी महिन्यात चीनच्या हेबेई शहरातील झांगजियाकामध्ये एक फूड मार्केटमध्ये आग लागली. आग लागल्‍याच्या घटनेत आठ लोकांचा मृत्‍यू झाला होता आणि १५ लोक जखमी झाले होते. याआधी एक महिन्यापूर्वी पूर्व चीन मधील रोंगचेंग शहरात एक बांधकामाच्या ठिकाणी आग लागल्‍याने ९ लोकांचा मृत्‍यू झाला होता. चीनमध्ये बांधकाम नियमाविषयी डोळेझाकपणा आणि कार्यस्‍थळावर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेप्रती अनास्‍थेमुळे जीवघेण्या आगीच्या घटना घडत असतात.

Comments
Add Comment

अमेरिकेच्या गाझा शांतता योजनेशी हमास सहमत

वॉशिंग्टन : पॅलेस्टिनी मिलिशिया गट हमासने अमेरिकेच्या गाझा शांतता प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. शांतता

सरकारी निधी थांबल्यामुळे नासातही शटडाऊन

वॉशिंग्टन : अमेरिकेते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर उच्च टॅरिफ लावले असताना, त्यांच्या

Munich Airport : हादरा! म्युनिक विमानतळावर अचानक '१७ रशियन ड्रोन'; तातडीने विमानसेवा बंद

म्युनिक : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध आता केवळ दोन देशांपर्यंत मर्यादित राहिलं नसून, त्यात जगातील अनेक

रशियाच्या दोन मोठ्या निर्णयांमुळे भारताचा फायदा

मॉस्को : भारत रशियातून करत असलेल्या आयातीत वाढ झाली आहे. वाजवी दरामुळे भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेलाची

पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे बेताल वक्तव्य, Pok खेळाडूबाबत म्हणाली असं काही...आता दिले हे स्पष्टीकरण

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि सध्या समालोचक (Commentator) म्हणून काम पाहणाऱ्या सना

पाकव्याप्त काश्मीर पेटला! लष्कराची सुद्धा केली नाकांबदी; पीओकेत पाक सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार ; १० जणांचा मृत्यू तर १०० जखमी

जीवनावश्यक वस्तूंवरील सबसिडी रद्द केल्याने जनक्षोभ उसळला! आंदोलकांकडून सैनिकांचा 'मानवी ढाल' म्हणून