Tuesday, April 29, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

India vs Bangladesh : भारताने बांगलादेशला दिला जबर झटका

India vs Bangladesh : भारताने बांगलादेशला दिला जबर झटका नवी दिल्ली : भारताच्या ईशान्येकडील सात राज्यांचा समुद्राशी थेट संपर्क नाही. ही राज्ये समुद्रासाठी बांगलादेशवर अवलंबून आहेत. या भागात चीनला गुंतवणुकीची संधी आहे; अशा स्वरुपाचे वक्तव्य बांग्लादेशच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी केले. चीन दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केले. या वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने बांगलादेशची कोंडी करायला सुरुवात केली आहे. याआधी शेख हसिना सरकार असताना भारतीय विमानतळ, बंदर, रेल्वे आणि महामार्ग वापरुन बांगलादेशला आयात - निर्यात व्यापार करायला परवानगी होती. आता ही परवानगी काढून घेण्यात आली आहे. ट्रान्सशिपमेंट कार्गो सर्व्हिस बंद झाल्यामुळे बांगलादेशच्या आयात - निर्यात व्यापारावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. भारताच्या सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम विभागाने एक परिपत्रक काढून बांगलादेशला दिलेली ट्रान्सशिपमेंट कार्गो सर्व्हिस बंद केल्याचे जाहीर केले आहे. ट्रान्सशिपमेंट कार्गो सर्व्हिसची परवानगी देणारे २९ जून २०२० चे परिपत्रक रद्द करण्यात आल्याचे नव्या परिपत्रकात नमूद आहे. भारताकडून मिळालेल्या ट्रान्सशिपमेंट कार्गो सर्व्हिसमुळे बांगलादेश आतापर्यंत भूतान, नेपाळ आणि म्यानमार यांच्याशी थेट व्यापार करू शकत होता. हा व्यापार आता अडचणीत सापडणार आहे.
Comments
Add Comment