पुणे : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एससीईआरटी) घेण्यात येत असलेल्या ‘पायाभूत चाचणी परीक्षा-दोन’ (पॅट) परीक्षेची इयत्ता नववीची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी एससीईआरटीने संबंधित युट्युब चॅनलच्या चालकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. परंतु, या प्रकरणाची सखोल चौकशीही शिक्षण विभागामार्फत करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या पॅट परीक्षेला सुरवात झाली आहे. या अंतर्गत इयत्ता नववीची मराठी प्रथम भाषा या परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच सोशल मिडियाद्वारे फुटली. केवळ एकाच नव्हे तर जवळपास २० हून अधिक यु-ट्युब चॅनलवर ही प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचे दिसून आले.
अर्थात, एससीईआरटीमार्फत संबंधित युट्यूब चॅनेल्सच्या चालकांविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवून कारवाईचा बडगा उगारला. परंतु, मुळात ही प्रश्नपत्रिका नेमकी फुटली कोठून याचा शोध एससीईआरटीने घेणे आवश्यक असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…
एक्स्प्रेस गाड्याही रखडल्या मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा ते कल्याण मार्गादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे…
४ जणांचा मृत्यू; १० जण अडकल्याची शक्यता नवी दिल्ली : नवी दिल्लीतील (New Delhi) मुस्तफाबाद…