Dombivali : डोंबिवलीत मराठीवरुन वाद! महिलेने 'एस्क्युज मी' बोलताच तरुणांकडून मारहाण

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठी भाषेवरुन वाद निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक ठिकाणी मराठी भाषेला दुय्यम दर्जा दिला जात असल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. इंग्रजी नाही तर मराठी भाषेचा वापर व्हावा; यासाठी मनसेकडून आग्रह धरला जात आहे. अशातच डोंबिवलीमध्ये (Dombivali) सहज वापरल्या जाणाऱ्या 'एस्क्युज मी' या इंग्रजी शब्दावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. महिलेने काही तरुणांना 'एस्क्युज मी' बोलताच त्यांनी वाद घालण्यास सुरवात केली. इतकेच नव्हे तर महिलेच्या घरच्यांनाही मारहाण केल्याचे समोर आले आहे.



डोंबिवली (Dombivali) पश्चिमेकडील जुनी डोंबिवली येथील गणेश श्रद्धा बिल्डिंगमध्ये हा प्रकार घडला. पुनम गुप्ता नावाची महिला काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मैत्रिणीसोबत घराकडे जाण्यासाठी निघाली होती. यावेळी रितेश बाबासाहेब ढबाले या तरुणासह त्याचे मित्रमंडळी बिल्डिंगबाहेर रस्त्यावर उभे होते. त्यांना बाजूला होण्यासाठी पुनम गुप्ताने "Excuse me" असे इंग्रजीत म्हटले. मात्र एक्सक्युज मी म्हणताच तरुण संतापले आणि त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली.


वाद होताच रितेश ढबाले, त्याची पत्नी आणि त्याच्या वडिलांसह काही साथीदारांनी "इंग्रजी नको, मराठीत बोला" म्हणत पुनम आणि त्यांच्या मैत्रिणीला चापट्या मारून बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर या गोंधळात पुनम यांचे पती आणि दुसरी मैत्रीण तेथे मदतीला आली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. (Dombivali Crime)


दरम्यान, या घटनेबाबत विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्ह्यांची नोंद करत तपास सुरू केला आहे. परंतु या वादामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य

कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता

आता बँकेसारख्या सुविधा लवकरच! मुंबई : देशातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या काही

हार्बरवर साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई : कुर्ला ते टिळकनगरदरम्यान वळण मार्गिकांच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.०५ ते उद्या, रविवार दुपारी १.३५