Massive US Protest : डोनाल्ड ट्रम्प अन् एलॉन मस्क यांच्या विरोधात हजारो अमेरिकन नागरिक रस्त्यावर!

वॉशिग्टन : वाढीव आयात शुल्क लागू करत जगभरातील देशांना वेठीस धरणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारभाराविरुद्ध अमेरिकन नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. त्याचबरोबर त्यांचे सल्लागार जगातील उद्योजक एलाॅन मस्क यांच्या धोरणांवरही जनमत भडकू लागले आहे. या दोघांच्या निषेधार्थ शनिवारी ट्रम्प सरकारच्या धोरणांविरुद्ध मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. ट्रम्प आणि मस्क यांच्यापासून अमेरिकेतील लोकशाही धोक्यात आली आहे, असा आरोप यावेळी निदर्शकांनी केला.



गेल्या काही दिवसांपासून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या काही मोठ्या निर्णयांमध्ये प्रामुख्याने बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा असेल, नवीन टॅरिफ धोरण (आयात शुल्क) असेल किंवा अमेरिकेतील कर्मचारी कपातीचा निर्णय असेल अशा या निर्णयांचा समावेश आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका जगभरातील अनेक देशांना बसला आहे. या धोरणांच्या विरोधात अमेरिकन नागरिक ‘हॅन्ड्स ऑफ’ असे पोस्टर्स हातात घेऊन रस्त्यावर उतरले.


सरकारी नोकऱ्यांमध्ये कपातीचा निर्णय, देशाची अर्थव्यवस्था, मानवाधिकार आणि टॅरिफ धोरण अशा मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन नागरिकांनी शनिवारी मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले आहेत. काही दिवसांपूर्वी युनायटेड स्टेट्समधील सरकारी जमिनींचे व्यवस्थापन आणि माजी सैनिकांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी कपात करण्यात आली, गृह, ऊर्जा, माजी सैनिक व्यवहार, कृषी, आरोग्य आणि मानवी सेवा अशा विभागातील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. अशा वेगवेगळ्या निर्णयांच्या निषेधार्थ आता अमेरिकन नागरिकांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला आहे. या आंदोलनामध्ये नागरी हक्क संघटना, कामगार संघटना, वकील संघटनासह यूएसमधील १५० हून अधिक संघटना आणि हजारो अमेरिकन निदर्शकांनी वॉशिंग्टन, न्यू यॉर्क, ह्युस्टन, फ्लोरिडा, कोलोरॅडो आणि लॉस एंजेलिससह तब्बल १२०० ठिकाणी रस्त्यावर उतरून जोरदार निषेध केला. यावेळी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने घेतलेल्या धोरणांचा विरोध करत निदर्शकांनी आर्थिक धोरणांबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच काही निदर्शकांनी डोनाल्ड ट्रम्प आपल्याला जागतिक मंदीमध्ये ढकलतील, असेही म्हटले आहे.


दरम्यान, निदर्शनांवर व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भूमिका स्पष्ट आहे. पात्र लाभार्थ्यांपर्यंत सामाजिक सुरक्षा, वैद्यकीय सुविधा देण्याच्या बाजूने ते नेहमी आहेत. डेमोक्रॅट्सचा दृष्टिकोन बेकायदेशीर परदेशी नागरिकांना सामाजिक सुरक्षा, मेडिकेड आणि मेडिकेअर फायदे देण्याचा आहे. यामुळे हे कार्यक्रम दिवाळखोरीत निघतील आणि अमेरिकन ज्येष्ठ नागरिकांना त्याचे परिणाम भोगावे लागतील."

Comments
Add Comment

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ दोन ड्रोन कोसळले, एका भारतीयासह ४ जण जखमी

अबू धाबी : इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय

हैद्राबादहून निघालेल्या विमानाचा अपघात; चाक निखळले अन् १३३ जणांचे प्राण...

फुकेत : हैद्राबादहून थायलंडकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला लँडिंगदरम्यान गंभीर तांत्रिक बिघाड

इलेक्ट्रॉनिक जॅमर सक्रीय, समुद्रात जहाजांची वाहतूक कोलमडली

तेहरान : पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धाचा एक भाग म्हणून शत्रू देशांनी

पुतिन यांच्या विधानाने खळबळ, पुढील ३० दिवसात तेल पुरवठा बंद होणार?

मुंबई: इराण आणि इस्रायलमधील युद्ध तसेच जागतिक भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष

इराणसमर्थक पोस्ट करणे नागरिकांना पडले महागात; सहा परदेशी नागरिकांना अटक

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बहरीन देशाच्या सुरक्षा यंत्रणांनी सोशल मीडियावर इराणसमर्थक

Iran Israel War : युद्धाचा शेवट अमेरिका नाही तर इराणी सैन्य ठरवणार- आयआरजीसी

इराणमधील युद्ध कधी संपवायचे याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर