मुंबई : सध्या लगीनसराईचे दिवस सुरु असून गेल्या काही दिवसांपासून सोनं चांदीच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे सोनं खरेदीदारांना चांगलाच फटका बसत आहे. मात्र आज सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. सोन्याच्या दरात सुरू असलेल्या तेजीला ब्रेक लागला असून काहीशी घसरण झाली आहे. जाणून घ्या इतर शहरातील आजचे सोन्याचे दर.
आज सोमवार ७ एप्रिल २०२५ रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात २ हजार ८०० रुपये प्रति १०० ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे १०० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९ लाख ६ हजार ६०० रुपयांवरुन ९ लाख ३ हजार ८०० रुपये इतका झाला आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दरात २८० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर ९० हजार ६६० रुपयांवरुन ९० हजार ३८० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, सांगली, बारामती या शहरात काल २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ९० हजार ६६० रुपये होता. तो दर आह ९० हजार ३८० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
तर मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, सांगली, बारामती या शहरात काल २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ८२ हजार ८५० रुपये होता. तो दर आह ८३ हजार १०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…